Sagar Shinde esakal
नाशिक

Nashik Fraud Crime News: फर्टिलायझर कंपनीची लाखोंची फसवणूक; खत विक्रत्याला इंदिरानगर पोलिसांकडून अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime News : अक्षत फर्टीलायझर अॅन्ड प्लांन्ट न्युट्रीशन प्रा. लि. या कंपनीची सुमारे 51 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी रायगड कृषी उदयोगाच्या संचालकास इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी इंदिरा नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Fraud Crime Fertilizer company defrauded of lakhs)

सागर कैलास शिंदे (रा. रायगड कृषी उदयोग, घोटी रोड, हनुमान मंदिरजवळ, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे संशयितांचे नाव आहे. अक्षत फर्टीलायझर कंपनीचे विभागीय अधिकारी रोशन मोरे (रा हरी दर्शन अपार्टमेन्ट, वृंदावन नगर, जत्रा हॉटेल, आडगाव) यांच्या फिर्यादीनुसार, 2019 मध्ये सिन्नर तालुक्याकरीता रायगड कृषी उदयोग संचालक सागर शिंदे यांचेशी कंपनीचे डीलरशीपसाठी रॉड रिओ हॉटेल, लेखा नगर नाशिक येथे बैठक झाली.

डिलरशिप सिक्युरिटीकरिता कंपनीत 25 हजार रूपये भरल्याने त्यांना सिन्नर तालुक्याची कंपनीच्या मालाची डिलरशिप दिली होती. त्यानंतर 51 लाख 27 हजार 274 रूपयाचे खते 60 दिवसांत कंपनीचे मालाचे पैसे देतील या करारावर दिली. (latest marathi news)

दीड महिन्यात शिदे याने फक्त 1 लाख रुपये परत केले व वेळोवेळी मुदत वाढवुन घेवुन ऑगष्ट 2019 दुकान बंद करुन फरार झाला. आजपर्यंत पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने कंपनीकडे नियमानुसार सागर शिंदेने कंपनीकडे दिलेला कोरा धनादेश बँकेत वटवन्यासाठी दिला असता चेक बाऊन्स झाला आहे.

याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट1च्या पथकाने शिंदे यास अटक केली आहे. गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT