Nashik Fraud Crime : मुलींची संख्या कमी झाल्याने विवाहेच्छुकांना मुली मिळत नाही, या परिस्थितीचा गैरफायदा घेत चांदवड तालुक्यातील भयाळे येथील एकाची सुरगाणा व पेठ तालुक्यामधीलमधील चौघांनी एक लाख तीन हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला.
सुरगाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Nashik Fraud Crime Fraud of 1 lakh on lure of finding marriageable girl)
भयाळे (ता. चांदवड) येथील ४९ वर्षे व्यक्तीने विवाहयोग्य मुलगी शोधण्यासाठी अनेकांना सांगितले होते. त्यातून त्यांची सुनील चौधरी, कृष्णा गावित, जगन चौधरी व मुलगी संगीता गांगुर्डे तसेच मुलीच्या मामाची ओळख झाली होती.
मांदा येथे मुलगी बघितली. मुलीचे पुढचे आयुष्य सुखकर जावे यासाठी अगोदरच तिच्या नावावर बँकेत पैसे टाकण्याचे ठरले होते. फिर्यादीस वारंवार फोन करून ३२ हजार ५०० रुपये फोन पेद्वारे तर उंबरठाण येथे रोख सत्तर हजा ५०० रुपये रोख स्वरूपात घेतले.
नंतर या चौघांनी विवाह जमवून देण्यास नकार दिला. शिवाय रक्कमही परत केली नाही. रक्कम परत मागितली असता शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक संदीप काळे व पोलिस कर्मचारी दिलीप वाघ करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.