Instagram Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime News : ‘इन्स्टा’वर पाहून भुलली अन्‌...त्यानं लग्नाचे आमिष दाखवून घातला 8 लाखांना गंडा

Crime News : प्रत्यक्षात संशयित जेव्हा युवतीला भेटायला आला तेव्हा तो इन्स्टाग्रामवर असलेला संशयित नसल्याचे उघड झाल्याने युवतीने त्याच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली असता, संशयित पसार झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोण, कोणाला कशारितीने गंडा घालेल याचा काही मागमूस राहिलेला नाही. शासकीय नोकरदार असलेल्या युवतीची इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या भामट्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून ८ लाख रुपये घेतले. प्रत्यक्षात संशयित जेव्हा युवतीला भेटायला आला तेव्हा तो इन्स्टाग्रामवर असलेला संशयित नसल्याचे उघड झाल्याने युवतीने त्याच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली असता, संशयित पसार झाला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसात संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Fraud Crime girl cheated on instagram marathi)

सदाशिव बैजनाथ कदम (२९, रा. पोन्ना, तेलंगणा) असे संशयिताचे नाव आहे. २३ वर्षीय युवतीच्या फिर्यादीनुसार, पीडित युवती ही नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात कॉन्स्टेबल आहे. डिसेंबर २०२३ मध्ये तिची इन्स्टाग्रामवर संशयित सदाशिव याच्याशी ओळख झाली.

संशयित सदाशिव याने स्वत:ची ओळख आरपीएफ (रेल्वे पोलीस दल) मध्ये उच्च पदस्थ अधिकारी असल्याची करून दिली होती. इन्स्टाग्रामवर संशयित सदाशिव याने त्याचे फोटो शेअर केलेले होते. काही दिवसात त्यांच्यात चांगली मैत्री झाली. त्यानंतर संशयित सदाशिव याने युवतीला लग्नाची मागणी घातली आणि लवकरच लग्न करण्याचे आमिषही दाखविले.

परंतु नंतर त्याने तिच्याकडून या ना त्या कारणाने पैसे मागणे सुरू केले. पीडित युवतीचा त्याने विश्वास संपादन केलेला असल्याने तीही त्याला पैसे देत गेली. फेब्रुवारी अखेरपर्यंत संशयिताने तिच्याकडून तब्बल ८ लाख रुपये घेतले. त्यानंतर युवतीने त्याच्याकडे भेटण्याचा तगादा लावला.  (latest marathi news)

त्यानुसार संशयित सदाशिव तिला भेटण्यासाठी नाशिकला आला असता, त्याला पाहून युवतीला धक्काच बसला. इन्स्टाग्रामवरील फोटोत असलेला संशयित, प्रत्यक्षात वेगळाच होता. त्यामुळे युवतीने संशयिताकडे पैशांची मागणी केली. मात्र त्यानंतर संशयिताने तिच्याशी कोणताही संपर्क ठेवलेला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने उपनगर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र बैसाने हे करीत आहेत.

कर्ज काढून पैसे दिले

संशयिताच्या प्रेमात पडलेल्या पीडित युवतीकडे त्याने सतत पैशांची मागणी केली. त्याप्रमाणे युवतीने त्याला पैसे दिले. ८ लाखांपैकी बहुतांशी रक्कम तिने पर्सनल लोनसह अनेकप्रकारे कर्ज काढून दिले असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. पोलिस इन्स्टाग्रामवरील संशयिताचा शोध घेत आहेत.

"सोशल मीडियावर ओळख होणे पुरेसे नाही. प्रत्यक्ष भेटीनंतरच समोरील व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा हे ठरवायचे असते. याप्रकरणी पोलीस तपास करीत असून संशयिताचा शोध घेतला जात आहे."- नरेंद्र बैसाणे, सहायक पोलीस निरीक्षक, उपनगर पोलीस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT