Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : टोकडेतील अपहार प्रकरणी मागविला चौकशी अहवाल; विठोबा द्यानद्यान यांचे उपोषण स्थगित

Fraud Crime News : बैठकीत ग्रामपंचायतींतर्गत २३ लाखांची कामे कागदोपत्री दाखविण्यात आल्याचे उघड झाले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : टोकडे (ता. मालेगाव) येथील ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांच्या जिल्हा परिषदेसमोरील उपोषणाची दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी मालेगावचे गटविकास अधिकारी अजितसिंग पवार यांना सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याने द्यानद्यान यांनी आंदोलन स्थगित केले. (Inquiry report called for in case of tokade gram panchayat embezzlement)

बैठकीत ग्रामपंचायतींतर्गत २३ लाखांची कामे कागदोपत्री दाखविण्यात आल्याचे उघड झाले. १० ऑगस्टपर्यंत संबंधित भ्रष्टाचाऱ्यांवर फौजदारी कारवाई न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर १२ ऑगस्टपासून अर्धनग्न आंदोलन करण्याचा पवित्रा द्यानद्यान यांनी घेतला आहे.

यात अशा प्रकारे अपहार झालेल्या जिल्ह्यातील इतरही ग्रामपंचायती सहभागी होणार असल्याचे द्यानद्यान यांनी सांगितले. द्यानद्यान यांचा अपहार प्रकरणी चार वर्षांपासून लढा सुरू आहे. त्यांच्या आंदोलनानंतर दरवेळी त्यांना आश्वासने दिली जात आहेत. (latest marathi news)

आताही द्यानद्यान यांच्या उपोषणाची दखल घेऊन श्रीमती फडोळ यांनी बैठक घेतली. गटविकास अधिकारी पवार, विस्तार अधिकारी संजय महाले आदी उपस्थित होते. न झालेल्या कामाचे २३ लाख रुपये काढून घेण्यात आले. त्यास बांधकाम विभाग जबाबदार असल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे फडोळ यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. झालेल्या चर्चेनुसार १० तारखेपर्यंत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यावर द्यानद्यान यांनी आंदोलन तूर्तास स्थगित केले. तोपर्यंत गुन्हे दाखल न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले जाणार असल्याचे द्यानद्यान यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: सुसंस्कृत समाजात ‘बुलडोझर न्याय’ मान्य नाही; डीवाय चंद्रचूड यांनी आपल्या शेवटच्या निकालात योगी सरकारला फटकारले

२४ चेंडूवर १२० धावांचा पाऊस; ट्वेंटी-२० इतिहासातील वादळी खेळी, संघाच्या २०३ धावांत एकटीच्या १५० धावा, Video

Smartphone Tips : मोबाईल वापरताना सतत गरम होतोय? पटकन करून घ्या हे काम,नाहीतर होईल मोठे नुकसान

Vijay Wadettiwar : थापा मारणाऱ्या महायुतीला सत्तेतून खाली खेचा,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे बल्लरपुरात आवाहन

Akola West Assembly Election : विजय खेचून आणणे सोपे नाही....अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात घमासान

SCROLL FOR NEXT