Nashik Fraud Crime : पोलीस असल्याची बतावणी व पॉलिशच्या बहाण्याने सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास करण्याचे प्रकार नेहमीच घडतात. मात्र आता तर भामट्यांनी नवीन शक्कलच शोधून काढली आहे. भररस्त्यात कार थांबवायची आणि चालकाला इंजिनने पेट घेतल्याचे भासवून रिपेअरिंगच्या नावाखाली आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार कॉलेजरोडला घडला. (nashik fraud crime marathi news)
दरम्यान फसवणूक झाल्यानंतर तक्रारदार कारचालकाने पोलिसात धाव घेतली असता, पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने संशयित दुसरा सावज शोधायला शहरात मोकाट फिरत आहेत. शहरातील प्रसिद्ध आर्किटेक्चर हेमंत बुट्टे (रा. चांदसी) हे रविवारी (ता. ३) दुपारी कॅनडा कॉर्नरकडून कॉलेजरोडकडे त्यांच्या फॉक्सवॅगन कारने जात होते. बाटा शुज शोरुमसमोर असताना दोघांनी त्यांना हाताने काहीतरी इशारा केला.
परंतु त्यांनी दूर्लक्ष केले. ते बीवायके कॉलेजजवळ आले असता, पुन्हा दोघांनी त्यांना तसाच इशारा केला. त्यामुळे बुट्टे यांनी कार थांबविली असता, दोघांनी त्यांना कारच्या बोनेटमध्ये इंजिनला आग लागल्याचे सांगितले. बुट्टे कारमधून बाहेर आले. संशयित दोघांनी त्यांना बोनेट उघडण्यास सांगितले.
बोनेट उघडले असता संशयितांनी जळल्याचा वास येतो ना, असे म्हटले. मात्र बुट्टे भ्रमित झाले. संशयितांनी त्यांना पुन्हा कार सुरू करण्यास सांगितले असता, यादरम्यान संशयितांनी इंजिनजवळ काहीतरी टाकले. त्यामुळे कार सुरू करताच इंजिनजवळ स्पार्क झाल्यासारखे झाले. ते पाहून बुट्टेही काहीसे घाबरले. (latest marathi news)
संशयितांपैकी एकाने स्वत:चे नाव दीपक पाटील सांगत, आपला ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून जवळच कारमॅकेनिकला घेऊन या असे म्हणाले. पण काही क्षणात पुन्हा संशयित पाटील याने त्याच्या साथीदाराला मॅकेनिकला घेऊन यायला पाठविले. येताना तो संशयित हातात काहीतरी चौकोनी पार्ट घेऊन आला.
मॅकेनिक बाहेर गेल्याचे सांगत त्यानेच तो पार्क इंजिनजवळ काहीतरी केल्याचे भासवून बसविल्याचे सांगितले. पुन्हा कार सुरू केली असता स्पार्क झाला नाही. यानंतर बुट्टे यांनी पार्ट बसविल्याबद्दल पैसे विचारले असता संशयितांनी पाचहजारांचा पार्ट, मजुरी एक हजार असे सहा हजार मागितले. बुट्टे यांनी तडजोड करीत ५ हजार रुपये संशयित दीपक पाटीलच्या मोबाईलवर युपीआयद्वारे दिले.
अन फसवणूक आली लक्षात
बुट्टे घरी आल्यानंतर ही बाब मुलास सांगितले. मुलाने कारची तपासणी केली असता, तसा कोणताच पार्ट बसविला नसल्याचे लक्षात आहे. ज्या युपीआय क्रमांकावर पैसे ट्रान्सफर केले त्यावर संपर्क साधला असता तो मोबाईल स्वीचऑफ आला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
पोलिसात धाव
बुट्टे यांनी गंगापूर पोलिसात धाव घेत आपबिती पोलीस अधिकार्यांना सांगितली. संशयितांकडून पुन्हा कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून कॉलेजरोडवरील सीसीटीव्ही फुटेज पाहून संशयितांना जेरबंद करण्याची मागणी केली. परंतु पोलिसांनी थंड प्रतिसाद देत, उद्या (सोमवारी) या, आपण कॉलेजरोडचे सीसीटीव्ही फुटेज तपासू असा सांगत त्यांना परत पाठविले.
''संशयितांची भाषा ठाण्याकडची होती. ज्या मोबाईल क्रमांकावर पैसे ट्रान्सफर केले त्यावर जगन्नाथ काशिराम कोंडविलकर हे नाव येते आहे. असे प्रकार मुंबई, ठाण्यात सर्रासपणे होत असल्याचे नंतर समजले. पोलिसांनी वेळीच कारवाई केली तर आणखी कोणाची फसवणूक होणार नाही.''- हेमंत बुट्टे, चांदसी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.