A police team with the arrested suspect in the theft and the seized items. esakal
नाशिक

Nashik Crime News : चोरीचे सोने विकायला आले, अन्‌ पोलिसांनी गजाआड केले

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सोने विक्रीसाठी आलिशान कारमध्ये मखमलाबाद गावात दाखल झालेल्‍या दोन संशयितांना म्‍हसरूळ पोलिसांनी सापळा रचत गजाआड केले. चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आलेल्‍या संशयितांना शिताफीने पकडत पोलिसांनी चोरीच्‍या गुन्ह्याची उकल केली आहे. संशयितांकडून रोख रक्कम, मोबाईल, चारचाकी वाहन, सोन्याची लगड असा एकूण दोन लाख नऊ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्‍तगत केला आहे. (thief came to sell stolen gold and police cracked down )

प्रीतेश ऊर्फ विशाल तानाजी शिंगाडे (रा. ओमनगर, विद्यानगर, मखमलाबाद रोड) व त्याच्‍या अल्‍पवयीन साथीदाराला पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक, परिमंडळ एकचे उपायुक्‍त किरणकुमार चव्‍हाण, सहाय्यक पोलिस आयुक्‍त नितीन जाधव यांच्‍या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे. त्‍यानुसार राबविल्‍या जात असलेल्‍या मोहिमेदरम्‍यान म्हसरूळ पोलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी कारवाई केली आहे.

याबाबत माहिती अशी, की दोन संशयित गुरुवारी (ता. २) चोरीचे सोने विक्री करण्यासाठी होंडा सिटी कारमधून मखमलाबाद गाव, गामणे मळा परिसरातील चहाच्‍या टपरीजवळ येणार असल्‍याची माहिती पोलिस अंमलदार प्रशांत देवरे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. बातमीची खात्री करून कार्यवाही करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक यू. एम. हाके, पोलिस उपनिरीक्षक दीपक पटारे व गुन्हेशोध पथकाचे अंमलदार यांनी गामणे मळा परिसरात सापळा रचला.

तेथे दोन संशयित होंडा कारमध्ये आले. बातमीची खात्री झाल्याने पोलिस पथकाने जागीच धरपकड केली. संशयित प्रीतेश उर्फ विशाल यासह त्‍याच्‍या साथीदाराला पोलिसी खाक्‍या दाखविला असता, त्‍यांनी म्‍हसरूळ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्‍या गुन्ह्यासंदर्भात कबुली दिली. पोलिसांनी त्‍यांच्‍या ताब्‍यातून रोकड, मोबाईल, चारचाकी वाहन व सोन्याची लगड, असा दोन लाख नऊ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्‍तगत केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT