Nashik Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : फ्लॅट ग्राहकांना सव्वा तीन कोटींचा चूना! बिल्डर पसार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ध्रुवनगरमध्ये मौर्या हाईटस्‌ नवीन इमारतीतील वन-बीएचके फ्लॅटसाठी ग्राहकांकडून गुंतवणूक करून घेण्यासाठी फ्री रजिस्ट्रेशनसह अनेक प्रलोभने दाखविली. परंतु त्यानंतरही ३० ग्राहकांकडून ३ कोटी २६ लाखांची रक्कम घेऊन संशयित बिल्डर पसार झाला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहर आर्थिक गुन्हेशाखा या गुन्ह्याचा तपास करीत आहे. (Fraud Crime Three and a half crore lime to flat customers)

कुणाल प्रकाश घायाळ (रा. पाईपलाईन रोड, गंगापुर रोड )असे संशयित बिल्डरचे नाव आहे. प्रिंटिंग प्रेस व्यावसायिक अमोल भरत भागवत (रा. उत्तमनगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित बांधकाम व्यावसायिक कुणाल घायाळ याने गंगापूर शिवारातील ध्रुवनगर येथे ‘मौर्या हाईटस’ हा बांधकाम प्रकल्प २०१३ मध्ये सुरू केला.

के. के. डेव्हलपर्स व अंश प्रॉपर्टीज या नावाने कॉलेजरोड परिसरातील विसे मळा येथे स्वतःचे कॉर्पोरेट ऑफिस असल्याचे देखावा तयार केला. यामुळे येणाऱ्या ग्राहकांमध्ये घायाळ याने शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक असल्याचे भासविले. संशयित घायाळ याने तक्रारदार भागवत यांना अत्यंत कमी दरात फ्लॅट देतो असे आमिष दाखविले. (latest marathi news)

तसेच, भागवत यांच्याकडून ११ लाख ७० हजार रुपये घेऊन इमारत पूर्ण न करता आणि फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केली. अशारितीने याच बांधकाम इमारतीमध्ये ३० गुंतवणुकदारांकडूनही अंदाजे ३ कोटी २६ लाख रुपये घेत, करारनामा, साठेखत, नोटरी, जनरल मुख्तयार पत्र, दस्त संबंधित विभागात लिहून व नोंदवून फ्लॅटच्या मोबदल्यापोटी ठेवी घेतल्या आहेत. प्रत्यक्षात सदरील बांधकाम इमारतीचे काम पूर्ण न करता संशयित घायाळ पसार झाला आहे.

ग्राहकांना दाखविले प्रलोभने

संशयित बांधकाम व्यावसायिक कुणाल घायाळ याने कमी किमतीमध्ये वन बीएचके फ्लॅट देतानाच त्यासह फर्निश्ड फ्लॅट, स्टॅम्प ड्यूटी कमी, रजिस्ट्रेशन फ्री, सर्व खर्चांसहित फ्री अलोटेड पार्किंग, मॉड्युलर किचन ट्रॉली, एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉरड्राब बेड या सुविधाही देणार होता. तसेच, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २ लाख ६७ हजार रुपयांची सबसिडी, रेरा अँप्रुव्ह्ड इमारतीचे दस्तऐवजही ग्राहकांनो देण्याचे त्याने प्रलोभन दाखविले होते. त्याच्या या प्रलोभनांना ग्राहक भुलले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'प्रकाश आंबेडकरांची राज्यात एखादी तरी जागा निवडून आली असती, तर आम्ही त्याची दखल घेतली असती' - शरद पवार

Mumbai Crime: CSMT स्टेशन येथे सामूहिक बलात्कार झालेली 29 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरु

Latest Marathi News Live Updates : या ट्रिपल इंजिन सरकारची उलटी गिनती सुरू- सुप्रिया सुळे

Morning Routine: दिवसभर स्ट्रेस फ्री राहण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर करा 'या' गोष्टी, दिवसभर राहाल उत्साही

Bigg Boss 18 House: मातीच्या वस्तू अन् दगडाच्या खुर्च्या; कसं आहे सलमानच्या बिग बॉस १८ चं घर? पाहा inside video

SCROLL FOR NEXT