NEET-JEE Exam : अनुसूचित जातीतील (एससी) विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरच्या अत्यंत महत्त्वाच्या नीट ( NEET) आणि जेईई ( JEE ) परीक्षांच्या तयारीसाठी मदत मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (पुणे) अर्थात ‘बार्टी’मार्फत प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये म्हणजे दोन वर्षांकरिता एक लाख ४४ हजार रुपये विद्यावेतनासोबतच पाच हजार रुपये अभ्यास साहित्यासाठी दिले जाणार आहेत. ( Free Coaching for Scheduled Caste Students of NEET JEE )
या उपक्रमाच्या कार्यान्वयासाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था स्पेक्ट्रम ॲकॅडमीची निवड करण्यात आली आहे. स्पेक्ट्रम ॲकॅडमीच्या नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या ठिकाणी हे प्रशिक्षण उपलब्ध असणार आहे. नुकतेच अकरावी विद्यान शाखेत प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना नीट (NEET) आणि जेईई (JEE) परीक्षांच्या तयारीसाठी आता थेट महाराष्ट्र शासन मदत करणार आहे.
मेडिकल व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचे शिक्षण व मार्गदर्शन मिळावे, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे अर्थात, ‘बार्टी’मार्फत स्पेक्ट्रम ॲकॅडमीची निवड करण्यात आली असून, प्रवेशप्रक्रियेस नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या ठिकाणी सुरवात झाली आहे. (latest marathi news)
यासाठी स्पेक्ट्रम ॲकॅडमीने मोफत ‘हेल्प डेस्क’ची स्थापना केलेली असून, विद्यार्थी नाशिक- ९२२५१२९६८० / ८१, पुणे-७७७४०७६८९१ / ९०, छत्रपती संभाजीनगर- ९९२१०१२८७५ या क्रमांकावर संपर्क साधून प्रवेशप्रक्रिया, कागदपत्रे, पात्रता इत्यादी बाबींवर मार्गदर्शन मिळवू शकतात.
''नीट आणि जेईई यांसारख्या परीक्षांच्या तयारीसाठी बार्टीने सुरू केलेल्या या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचे शिक्षण व अभ्यास साहित्य मिळवून देण्यासाठी स्पेक्ट्रम ॲकॅडमी कटिबद्ध आहे. अनुसूचित जातीतील ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी ही सर्वांत मोठी संधी आहे.''- प्रा. सुनील पाटील, संचालक, स्पेक्ट्रम ॲकॅडमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.