Nashik News : रमजान पर्वात फळांची आवक घटली आहे. मागणी मात्र वाढल्याने दरांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशी मागणी विक्रेत्यांकडून देण्यात आली. कलिंगडाला अधिक मागणी आहे. नगावर मिळणारे कलिंगड सध्या किलोवर मिळत आहे. रमजान पर्वात रोजा इफ्तारसाठी फळांचा अधिक वापर केला जातो. फळाने रोजा सोडल्यानंतर इतर खाद्यपदार्थ सेवन केले जातात. (Nashik Fruit prices increase by 20 percent due to fall in income marathi news)
स्वस्त महाग कसेही फळ असले तरी मुस्लिम बांधवांकडून खरेदी केले जातात. सध्या रमजान पर्व सुरू आहे. सर्व प्रकारच्या फळांना मागणी वाढली आहे. इफ्तार बाजारात सर्वाधिक फळांचे दुकान सजल्या आहेत. असे असले तरी यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने फळांचे उत्पन्न घटले आहे. आवक कमी झाली आहे. तसेच उन्हाळ्यात फळांचा ज्यूस सेवन करण्याचे अधिक प्रमाण असते.
त्यासाठीही फळांची आवश्यकता भासत असल्याने मागणी वाढली आहे. रमजान पर्व आणि वाढलेली मागणी यामुळे फळांच्या दरात २० टक्के दर वाढ झाली आहे. रमजान पर्वानंतर दरात काहीशी घसरण होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे. रोजा इफ्तारनंतर पाणीयुक्त फळ अधिक प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघत असते. कलिंगडात पाण्याचे अधिक प्रमाण आहे.
शिवाय मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही कलिंगड सेवन करता येते. त्यामुळे मुस्लिम बांधवांकडून इफ्तारसाठी कलिंगडचा विशेष वापर केला जातो. इतर फळांपेक्षा त्यास अधिक मागणी असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले. नगावर विक्री होत असलेले कलिंगड सध्या किलोवर विक्री होत आहे. (latest marathi news)
असे आहे दर(प्रतिकिलो)
फळ.........................दर
सफरचंद......................१०० ते २५०
संत्री.........................५० ते २००
पपई..........................४०
आंबे...........................१५० ते ५००
कलिंगड........................२० ते २५
खरबूज.........................४० ते५०
पेर...........................२००
पेरू..........................८० ते १००
द्राक्ष..........................८० ते १२०
चिकू..........................४० ते ८०
मोसंबी.........................६० ते १२०
स्ट्रॉबेरी..........................२००
डाळिंब...........................८० ते २००
केळी.........................३० ते५० रुपये डझन
''फळांचे उत्पादन कमी झाल्याने आवक घटली आहे. रमजानने मागणी वाढल्याने दरांमध्ये वाढ झाली आहे.''- महम्मद अरमान, विक्रेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.