Fund  esakal
नाशिक

Nashik News : अंदाजपत्रकात तरतूद रक्कम खर्च करण्याकडे कल; जलकुंभ दुरुस्तीसाठी निधी

Nashik News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर पुढील ४० दिवसानंतर विधानसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागू होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर पुढील ४० दिवसानंतर विधानसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागू होणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने या वर्षीच्या अंदाजपत्रकात विविध विकासकामांसाठी तरतूद करण्यात आलेली रक्कम खर्च करण्याकडे विविध विभागांचा कल दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जवळपास २७ जलकुंभ नव्याने बांधण्यात आल्यानंतर आता जलकुंभ दुरुस्तीसाठी निधी खर्च करण्याची लगबग पाणीपुरवठा विभागाकडून सुरू आहे. (Funds for waterworks repair tend to spend provision amount in budget )

मलनिस्सारण विभागाकडूनदेखील ४० कोटींचे प्रस्ताव सादर झाल्यानंतर महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये खर्च करण्याची स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. लोकसभा व विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर आता ४० दिवसांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहेत. ही आचारसंहिता जवळपास दीड महिना असेल. त्या पाठोपाठ महापालिकेच्या निवडणुकादेखील होण्याची संकेत मिळत आहे. म्हणजे यंदाचे वर्ष हे निवडणुकांमध्ये जाणार आहे.

आचारसंहिता लागल्यानंतर महापालिकेला नवीन कामांसाठी निविदा किंवा नवीन कामांसाठी वर्क ऑर्डर देता येत नाही. त्यामुळे उर्वरित ४० दिवसांमध्ये अंदाजपत्रकात तरतूद केलेली रक्कम खर्च करण्याकडे अधिक कल दिसून येत आहे. वास्तविक रक्कम खर्च करताना त्या कामाची किती गरज आहे हे पाहणेदेखील अपेक्षित असताना होऊ द्या खर्च असे धोरण महापालिकेच्या विविध विभागाकडून राबविले जात आहे. मागील आठवड्यात झालेल्या महासभेमध्ये जवळपास ४१ कोटी रुपयांची मलनिस्सारण विभागाचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्या पाठोपाठ आता पाणीपुरवठा विभागाने जलकुंभ दुरुस्तीचे प्रस्ताव सादर केले आहे. (latest marathi news)

बऱ्याच जलकुंभात पाणीच नाही

मागील दोन वर्षांमध्ये जवळपास २७ नवीन जलकुंभ उभारले आहे. मात्र जलकुंभ उभारताना आवश्यक मनुष्यबळ तसेच जलकुंभाची आवश्यकता ही बाब दुर्लक्षित करण्यात आली. लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या शहरांमध्येदेखील एवढे जलकुंभ नाही. तेवढे १४० जलकुंभाची निर्मिती करण्यात आली आहे. यातील बरेचसे जलकुंभ तयार असून त्यात पाण्याचा थेंबदेखील नाही. अशा परिस्थितीमध्ये पाणीपुरवठा विभागाने जलकुंभ दुरुस्तीच्या नावाखाली करोड रुपये खर्च करण्याचे प्रस्ताव दाखल केले आहे.

पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये कठडा जलकुंभाच्या दुरुस्तीसाठी १ कोटी चार लाख रुपये, तसेच प्रभाग १५ मधील द्वारका जलकुंभाच्या दुरुस्तीसाठी ६९ लाख ३३ हजार रुपये व पखाल रोड येथील जलकुंभासाठी ३९ लाख ८४ हजार रुपये खर्च करण्याचे प्रस्ताव सादर केले आहे. गांधीनगर जलकुंभाला समांतर नवीन जलकुंभ बांधण्यात आला आहे. मात्र तरीही जुन्या जलकुंभाच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ४ लाख रुपये खर्च केले जात आहे. प्रभाग ३० मधील कलानगर येथील जलकुंभासाठी संरक्षक भिंत व इलेक्ट्रिक रूम बांधण्यासाठी ३९ लाख ८९ हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखीन एक पिस्तूल जप्त

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT