Nashik Flower Market esakal
नाशिक

Nashik Flowers Market : फूल व्यापाऱ्यांना गणपती-गौराई पावले! नवरात्रोत्सबाबत फूल व्यावसायिक आशावादी

Latest Flowers Market News : येणाऱ्या नवरात्रोत्सवात अशीच स्थिती राहावी. गणेशोत्सवात गौराई पावली. नवरात्रोत्सवातही हेच चित्र राहावे, अशी फूल व्यावसायिकांची अपेक्षा आहे.

रवींद्र मोरे

बिजोरसे : गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर कसमादेपट्ट्यात फूलबाजारात फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक होऊनही दर चढेच राहिले. येणाऱ्या नवरात्रोत्सवात अशीच स्थिती राहावी. गणेशोत्सवात गौराई पावली. नवरात्रोत्सवातही हेच चित्र राहावे, अशी फूल व्यावसायिकांची अपेक्षा आहे. (Ganapati Gaurai helped flower traders)

साधारणतः मालाची आवक वाढली, की त्याच्या दरात घसरण होते, असे अर्थशास्त्र सांगते. मात्र या सणात फुलांना मोठी मागणी असल्याने फुले, हारही भाव चढेच होते. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात कसमादेपट्ट्यात फूलविक्रेत्यांना गौराई पावली, असेच चित्र होते.

गणेशोत्सवात फुलांच्या दरात ५० ते ५५ टक्के वाढ झाल्यानंतरही ग्राहकांकडून फुलांना चांगली मागणी होती. एकावेळी मागणी आणि चांगले दरही मिळत असल्याने फूल व्यावसायिकांमध्ये गणेशोत्सवाच्या काळात चैतन्य पाहायला मिळाले.

नवरात्रोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवरात्रोत्सवात पूजेसाठी फुले लागतात. मुलांना खूप मागणी असते. दसऱ्याच्या दिवशी तर झेंडूचे फुले शेकडोच्या दराने विकली जातात. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सव भाव राहिले तर शेतकऱ्यांना दोन पैसेही मिळतील.

फुलांचे दर

बाजारात झेंडू, लिली, शेवंती, गुलाब, मोगरा, चमेली, अबोली, कण्हेरी ही फुले हार विक्रीमधून रोज लाखोंची उलाढाल होते. सण, उत्सवकाळात झेंडू, शेवंती या फुलांच्या हारांना मोठी मागणी असते. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत झेंडू, मोगरा आणि गुलाबांच्या फुलांची आवक वाढली असून, दरही टिकून आहेत. फुलांच्या तुलनेत फुलांपासून बनवलेल्या हारांना वाढीव दर मिळत आहे. (latest marathi news)

"गणेशोत्सवाच्या निमित्ताने फुलांची आवक वाढते. त्याचप्रमाणे दरातही वाढ झाली होती. राज्यात सर्वच भागात सध्या सुधारित शेतकरी फुलांच्या लागवडीकडे विशेष लक्ष देत असल्यामुळे फुलांचा दर्जादेखील सुधारला आहे. त्यामुळेच ग्राहकदेखील आनंदाने खरेदी करत आहेत. नवरात्रोत्सवात असेच चित्र अपेक्षित आहे."- रामनाथ पाटील, फूलविक्रेते शेतकरी

फुले दर

गुलाब १०० रुपये १० नग

कमळ २० रुपये प्रतिनग

मोगरा ५ रुपये प्रतिनग मोगरा

किलोचे दर

मोगरा ७०० रुपये

झेंडू १५० ते १६० रुपये

शेवंती ३०० रुपये किलो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT