Nashik Ganeshotsav 2023 esakal
नाशिक

Nashik Ganeshotsav 2023: देखावे पाहण्यासाठी उसळली गर्दी! चांद्रयान 3 सह ऐतिहासिक, पौराणिक कथांवर भर

सकाळ वृत्तसेवा

Nashik Ganeshotsav 2023 : रविवारी (ता. २४) शहरात दुपारनंतर पावसाने उघडदीप दिल्यानंतर शहरातील विविध भागात देखावे पाहण्यासाठी नाशिककरांनी एकच गर्दी केली.

या गर्दीमुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी बघावयास मिळाली. (Nashik Ganeshotsav 2023 Crowds turn out to witness spectacle Emphasis on historical mythological stories with Chandrayaan 3)

गणेशोत्सवामुळे शहरातील मोठ्या सार्वजनिक मंडळांकडून नाशिककरांसाठी विविध प्रकारचे देखावे तयार करण्यात आले आहे. यात खास करून अशोकस्तंभवरील कैलास पर्वतावरील भगवान शंकर, पार्वती बाप्पाचा पौराणिक देखावा सादर केला आहे.

मालेगाव स्टॅन्ड मित्रमंडळाने भगवान शंकर, पार्वती, गणपती असा देखावा सादर केला आहे. मुंबई नाक्यावरील युवक मित्रमंडळाने भव्य महाल सादर केला आहे.

तसेच चांद्रयान ३ सह ऐतिहासिक, पौराणिक कथांवर मंडळांकडून भर देण्यात आला आहे. सरदार चौक मित्रमंडळाने पशुपतीनाथ मंदिरचा देखावा सादर केला आहे.

रविवारी (ता. २४) गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवशी नाशिककरांनी देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. रविवार कारंजावरील श्री केदारनाथचा देखावा पाहण्यासाठी नाशिककरांची तर झुंबड उडाली.

देखावा आणि गणपती बाप्पासोबत सेल्फी घेण्याचा मोह तरूणाईला आवरता आला नाही. अशोकस्तंभ मित्रमंडळ, सरदार चौक मित्र मंडळासह कॉलेज रोडवरील गोदा श्रद्धा फाउंडेशन मित्रमंडळाचा देखावा पाहण्यासाठीही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

शहरातील बी. डी. भालेकर मैदानावर सर्वाधिक गणेश मंडळे असल्याने याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.

अशोकस्तंभ, रविवार कारंजा, शालिमार चौकात वाहतूक कोंडी

रविवारी (ता.२४) सायंकाळी पावसानेही उसंत दिली आणि देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात गर्दी वाढल्याने ठिकठिकाणी वाहतूकीची कोंडी झाली.

सलग दुसऱ्या मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ चौक, गंगापूर रोड, रविवार कारंजा, शालिमार चौक, झेड.पी. रोडवर वाहतूकीची कोंडी होती. स्मार्ट रोडवर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

स्मार्ट रोडवर अशोकस्तंभापासून ते जिल्हा न्यायालयापर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मेहेर सिग्नल यंत्रणा कोलमडून पडली. एमजी रोडकडून येणारी वाहतूकही खोळंबली.

तर अशोकस्तंभाकडून येणाऱ्या वाहतुकीला सरळ सीबीएसच्या दिशेने काढून देण्यात आले. अशोकस्तंभावर वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.

पर्यायी मार्ग दिलेले असतानाही काही वाहनचालक याच मार्गाने येत असल्याने वाहतूक कोडीत आणखीच भर पडली.

दोन दिवसांत मोठी उलाढाल

नाशिककरांनी रविवारी देखावे पाहण्यासाठी शहरातील विविध भागात विकेंडला गर्दी केली. विविध सार्वजनिक मंडळाच्या परिसरात खाद्यपदार्थ विक्रेतेही दाखल झाले होते. खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह छोटी पाळणे, खेळणी उपलब्ध असल्याने चिमुकल्यांचे मनोरंजन झाले.

शहरातील देखावे पाहण्यासाठी गर्दी झाल्याने खाद्यपदार्थासह पाळणे, खेळणी चालकांची मोठी आर्थिक उलाढाल होण्यास मदत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT