Illegal leveling of natural pits for parking. The work of Farm House is going on next to Gangapur Dam. esakal
नाशिक

Nashik News : गंगापूर धरण परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गंगापूर धरण परिसरामध्ये मनाई असतानासुद्धा रिसॉर्ट, फार्म हाउसचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. संबंधित बांधकामांना पार्किंगसाठी व्यवस्था व्हावी म्हणून नैसर्गिक खड्डे बुजवून पार्किंगसाठी अवैधरीत्या जागा सुरक्षित केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. अनधिकृत बांधकामांमुळे हळूहळू गंगापूर धरणाचा परिसरच फार्म हाउसच्या विळख्यात अडकून काबीज होतो की काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. ()

देशातील मातीचे धरण म्हणून गंगापूर धरण प्रसिद्ध आहे. या धरणातून शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. धरणापासून किती मीटर अंतर सोडून अटी व शर्तींच्या अधीन राहून बांधकाम केले जावे, यासाठी काही नियम आहेत. फार्म हाउस रिसॉर्टच्या बांधकामांसाठी तीनशे मीटर पूररेषा निश्चित केलेली आहे. धरण परिसराची देखभाल व दुरुस्ती ही जलसंपदा विभागाच्या अखत्यारित आहे.

मात्र अनेक बांधकामे या नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधित बांधकामे अशीच सुरू राहिली तर भविष्यात बांधकामे जास्त व धरण क्षेत्र कमी, असे चित्र बघायला मिळाले तर फारसे आश्चर्य वाटणार नाही. गंगापूर धरण परिसर पार्ट्याचे एक प्रकारे हक्काचे ठिकाण झालेय, असे चित्र दिसत आहे. धरण परिसरामध्ये नियम धाब्यावर बसवून काही विशिष्ट घटक ही बांधकाम करत आहे. (latest marathi news)

या माध्यमातून पर्यावरणाच्या नुकसानाबरोबरच या बांधकामांनंतर होणारा कचरा, ड्रेनेज यांची धरणातच विल्हेवाट लावली जात आहे. पण त्यापेक्षाही भयानक म्हणजे जी बांधकामे होत आहे त्या बांधकामांची सेफ्टी टॅंक व त्याद्वारे जाणारे मलमूत्र व ड्रेनेज याचा स्लोप धरणाच्या दिशेने आहे.

त्यामुळे निश्चितच दूषित पाणी व ड्रेनेज हे धरणाच्या पाण्यामध्ये मिसळले जाणार आहे. पूर्वी अशाच एका प्रसिद्ध वाइनरीने ड्रेनेज धरणामध्ये सोडले होते. त्यांच्यावर प्रदूषण मंडळांनी कारवाई करून वाइनरी सील केली होती. अशा कारवाया नेहमी व नियमितपणे होणे आवश्यक आहे, तरच या वाढत्या बांधकामांना आळा बसेल व धरण सुरक्षित राहील.

''धरण परिसरामध्ये निश्चित केलेल्या पूररेषेच्या जागेच्या आत बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. शासनाने निर्देशित केलेल्या नियमाप्रमाणे नोटीस बजावून प्रतिसाद मिळाला नाही, तर बांधकाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण काढण्यात येईल.''-सोनल शहाणे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT