Nashik Gangapur Dam esakal
नाशिक

Nashik Gangapur Dam : 2 दिवसात गंगापूर धरणाची पातळी वाढली! अद्यापही नाशिककरांना दमदार पावसाची प्रतीक्षा

Nashik News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पाण्याची पातळी सहाशे तीन मीटरपर्यंत पोचली असून, जवळपास साडेसहाशे दशलक्ष घनफूट पाणी साचले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पाण्याची पातळी सहाशे तीन मीटरपर्यंत पोचली असून, जवळपास साडेसहाशे दशलक्ष घनफूट पाणी साचले आहे. यात काश्यपी धरणातील २०० दशलक्ष घनफूट पाण्याचा समावेश आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट हळूहळू कमी होताना दिसत आहे. (Gangapur dam level increased in 2 days)

शहराला गंगापूर दारणा व मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी अपुरा पाऊस झाला होता. त्यामुळे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडी धरणासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. मात्र उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर जवळपास दीड टीएमसी पाण्याची बचत झाली.

गंगापूर धरणातील मोठा पाणीसाठा मात्र रिक्त झाला. परिणामी नाशिक महापालिकेच्या आरक्षणात कपात करण्यात आली. महापालिकेने जलसंपदा विभागाकडे सहा हजार १०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी नोंदविली. मात्र आरक्षणात कपात करण्यात आली. ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले.

३१ जुलैपर्यंत पाण्याची आरक्षण लक्षात घेता १८ दिवसांचा पाण्याचा शॉर्टफॉल आहे. जून महिन्यात राज्यात मॉन्सूनच्या पावसाची जोरदार हजेरी झाली, मात्र नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नाही अद्यापही नाशिककरांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. गंगापूर धरणातील पाण्याची पातळी ही ५९९ मीटर पर्यंत घसरली. (latest marathi news)

त्यामुळे नाशिककारांवर पाणीकपातीचे संकट गडद झाले होते. परंतु सध्या त्र्यंबक व इगतपुरी भागात ३० ते ४० मिनिटे दररोज पावसाची नोंद होत असल्याने मागील दोन दिवसात गंगापूर धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. सद्यःस्थितीत ६०३ मीटरपर्यंत पाणी पातळी पोचली असून, धरणात १५४५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे.

तर मागील दोन दिवसात जवळपास साडेसहाशे दशलक्ष घनफूट पाण्याचा नव्याने संचय झाला आहे. सद्यःस्थितीत धरणात ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. काश्यपी धरणांमध्ये १०३, तर गौतमी धरणामध्ये ३२३ दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा शिल्लक आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सद्यःस्थितीत उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता नाशिककरांवरील जलसंकट दूर होत असल्याचे दिसून येत आहे.

सद्यःस्थिती धरणातील पाणीसाठा (दलघफु)

- गंगापूर समूह - १९७१

- दारणा- २३९१

- मुकणे- ६५४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT