Civil Service Exam  esakal
नाशिक

Civil Service Exam : राज्‍य सेवा मुख्य परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्तायादी जाहीर

Civil Service Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्‍या राज्‍य सेवा (मुख्य) परीक्षा २०२३ ची सर्वसाधारण गुणवत्तायादी जाहीर केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्‍या राज्‍य सेवा (मुख्य) परीक्षा २०२३ ची सर्वसाधारण गुणवत्तायादी गुरुवारी (ता. २६) जाहीर केली आहे. या यादीत ८९६ उमेदवारांच्‍या नावांचा समावेश आहे. आयोगातर्फे फेब्रुवारी २०२३ मध्ये पूर्व परीक्षेसंदर्भात सूचनापत्र जारी केले होते. यानंतर निर्धारित वेळापत्रकानुसार पूर्व परीक्षा पार पाडताना मुख्य परीक्षेसाठी पात्रताधारक उमेदवारांची निवड करण्यात आली होती. (General Merit List of Civil Service Main Exam Announced )

नोव्‍हेंबर २०२३ मध्ये मुख्य परीक्षेचे परिपत्रक जारी केले होते. नुकतीच वेगवेगळ्या टप्प्‍यांमध्ये मुलाखतीची प्रक्रिया पार पाडल्‍यानंतर आयोगाने गुरुवारी सर्वसाधारण गुणवत्तायादी प्रसिद्ध केली आहे. ही यादी तात्‍पुरत्‍या स्‍वरूपाची असून, अर्जामधील विविध दाव्‍यांच्‍या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्‍या दाव्‍यांमध्ये बदल होऊ शकतो, असेही आयोगाने स्‍पष्ट केले आहे. एका उमेदवाराचा निकाल प्रशासकीय कारणास्‍तव राखून ठेवलेला आहे. सर्वसाधारण गुणवत्तायादी विविध न्‍यायालयात व न्‍यायाधिकरणात दाखल न्‍यायिक प्रकरणांवरील अंतिम निर्णयाच्‍या अधीन असेल, असेही आयोगाने स्‍पष्ट केले आहे. (latest marathi news)

पसंतीक्रमाची सुविधा लवकरच

या भरती प्रक्रियेत उपजिल्‍हाधिकारीपदासाठी नऊ पदे, राज्‍यकर सहाय्यक आयुक्‍त गट ‘अ’साठी १२, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी गट ‘अ’ ३६ पदे, वित्त व लेखा सेवा विभागातील सहाय्यक संचालक ४१ पदे, सहाय्यक कामगार आयुक्‍त दोन यांसह इतर विविध पदांचा समावेश होता. सर्वसाधारण गुणवत्तायादी जाहीर केली असली तरी वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन उमेदवारांना लवकरच पदांचे पसंतीक्रम ऑनलाइन स्‍वरूपात सादर करण्याची सुविधा उपलब्‍ध केली जाणार असल्‍याचे आयोगाने स्‍पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

SCROLL FOR NEXT