Guardian Minister Dada Bhuse speaking in a program held on the occasion of Revenue Fortnight at Manoj Bhavan. Officers and staff in front. esakal
नाशिक

Caste Certificate : जातीचे दाखले शाळा, महाविद्यालयातच द्या; पालकमंत्री दादा भुसेंचे प्रशासनाला आदेश

Nashik News : विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रवेशप्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी शाळा, महाविद्यालय स्तरावरच जातीच्या दाखल्यांचे वितरण करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रवेशप्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी शाळा, महाविद्यालय स्तरावरच जातीच्या दाखल्यांचे वितरण करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. अनेक वर्षांपासून गावात राहणाऱ्या भिल्ल (आदिवासी) समाजाच्या व्यक्तींकडे पुरेसे कागदपत्र नसतील, तर त्यांच्या गावातील सरपंच. (caste certificate)

ग्रामसेवक व पोलिसपाटील यांची लेखी संमती घेऊन त्यांनाही जातीचा दाखला देणे शक्य आहे का, याविषयी चाचपणी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. महसूल पंधरवड्यानिमित्त गुरुवारी (ता. १) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनातात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, आमदार सीमा हिरे उपस्थित होत्या.

शेतकऱ्यांना मदत मिळवून द्या

महसूल पंधरवड्यात वनपट्ट्याच्या सातबारा उताऱ्यावर एकत्रित नावे असतील आणि त्या सातबारा उताऱ्यावर ‘पोटखराबा’ असा उल्लेख असेल, तर अधिकाऱ्यांनी त्याची प्रत्यक्ष पाहणी करून ‘पोटखराबा’ हा शब्द काढण्याची प्रक्रिया करावी. ज्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना त्या जमिनीचा शासकीय योजनांसाठी वापर करणे शक्य होईल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री भुसे यांनी केले.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी ‘ई-ऑफिस’ प्रणाली भविष्यात क्रांती घडवेल, असा विश्‍वास व्यक्त केला. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रास्ताविक केले. उत्कृष्ट कार्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह प्रशासन अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ‘ई-ऑफिस’ योजनेंतर्गत नाशिकच्या तहसीलदार शोभा पुजारी यांना संगणक किट प्रदान करण्यात आले. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले. निफाडच्या प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांनी आभार मानले. (latest marathi news)

तलाठ्यांना नियुक्तिपत्र

जिल्ह्यातील बिगर आदिवासी तालुक्यांमध्ये नियुक्त झालेल्या ९६ तलाठ्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात पाच तलाठ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. मुख्य कार्यक्रमानंतर निवड झालेल्या सर्व तलाठ्यांना नियुक्तिपत्र देऊन गावांची जबाबदारी सोपवण्यात आली. नवनियुक्त तलाठी सहकुटुंब उपस्थित होते.

लाडक्या बहिणींचा सत्कार

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या अंगणवाडी सेविकांना पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यात शीतल महाले, रेखा सांगळे, स्वाती गायकवाड, सुवर्णा गोडसे, शीतल घटमाळे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. सुवर्णा गोडसे यांनी या योजनेविषयी भावना व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT