Cows admitted to Ujjwal Goshala. esakal
नाशिक

Nashik News : कत्तलीसाठी जाणाऱ्या गाईंना जीवदान; उज्ज्वल गोशाळेचा पुढाकार

Nashik : एखाद्याच्या आयुष्याची दोरी बळकट असेल तर दाराशी आलेल्या यमदुतालाही माघारी फिरावेच लागते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : एखाद्याच्या आयुष्याची दोरी बळकट असेल तर दाराशी आलेल्या यमदुतालाही माघारी फिरावेच लागते. मग ते माणसं असो की प्राणी. अशाच कत्तलीच्या उद्देशाने नेल्या जाणाऱ्या गोधनाच्या बाबतीत घडले. गेल्या पाच वर्षात दोनशेहुन अधिक गाई कत्तलीसाठी महामार्गावरून जात असताना गोरक्षकांनी त्यांचा जीव वाचविला अन् थेट पिंपळगाव-चिंचखेड रस्त्यावरील उज्ज्वल गोशाळेत दाखल केल्या. मुत्युला सामोरे जाव्या लागणाऱ्या गाईंना गोरक्षक व गोशाळेमुळे जीवदान मिळाले आहे. ( Giving life to cows going for slaughter )

मालेगाव-भिवंडी येथे भाकड गोधनाला अनधिकृतपणे कत्तलीसाठी नेले जाते. पिंपळगाव शहरातील गोरक्षकांच्या सजगतेमुळे सुगावा लागताच जनावरांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची धरपकड अन् कारवाई करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षात दोनशेहुन अधिक गाईंची सहीसलामत सुटका करण्यात आली आहे. सजगतेमुळे गौवंश कत्तलीसाठी नेणाऱ्यांची पाचावरण धारण बसली.

पूर्वी कसायच्या हाती जाण्यापासून गोधनाची सुटका केली जायची. पण, ते कुणाच्या ताब्यात द्यायचे, त्यांच्या पालनपोषणांचे काय याचा पेच उभा राहयचा. पंधरा वर्षापूर्वी पिंपळगावच्या कांदा व बेदाणा व्यापाऱ्यांनी जैन संत प्रितीसुधाजी यांच्या प्रेरणेने उज्ज्वल गोशाळेची स्थापना केली. भुतदया दाखवत गोधनाची पालन पोषण करण्याच्या उद्दात्त हेतूने गोशाळेची मुहुर्तमेढ रोवली गेली. (latest marathi news)

आता गोशाळेत ७०० हुन अधिक गोधनाचे पालन-पोषण होत आहे. कांदा व बेदाणा व्यापाऱ्यांबरोबरच अनेक दानशुर कुटुंबातील सदस्याच्या सुख-दुखाच्या निमित्ताने सढळ हाताने मदत करतात. गोशाळेत विविध पायाभूत सुविधा उभ्या राहत आहे. कबुतर खाना, ग्रीनजीम, सभागृह उभारण्यात आले आहे. कत्तलीसाठी जाणाऱ्या गाई आता गोशाळेत सुखरूप असून, अमावस्येला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.

''कत्तलीसाठी जाणाऱ्या गोधनांना जीवदान देता आले, याचे समाधान आहे. ७०० हुन अधिक गोधनाचे अन्न, पाणी व निवाऱ्याचे व्यवस्थापन दानशुरांच्या मदतीने केले जाते.''- महावीर भंडारी, विश्‍वस्त, उज्ज्वल गोरक्षण संस्था, पिंपळगाव बसवंत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT