Goat killed in leopard attack at Medhi in Sinnar taluka esakal
नाशिक

Nashik Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार तर एक शेळी जखमी

Latest Leopard News : अचानक पणे बिबट्याने रात्री शेळ्यांवर हल्ला करून एक शेळी जखमी तर या हल्ल्यात शेळी ठार केली.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : तालुक्यातील मेंढी गावच्या परिसरात बिबट्याने शेळीला ठार केल्याची घटना नुकतीच घडली असून. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. मेंढी गावच्या परिसरात प्रवीण मुरलीधर गीते यांच्या गोठ्यात शेळ्या असून. आपल्या घराशेजारी गोठ्यात शेळ्या बांधलेल्या होत्या. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक पणे बिबट्याने रात्री शेळ्यांवर हल्ला करून एक शेळी जखमी तर या हल्ल्यात शेळी ठार केली. (Goat killed and one goat injured in leopard attack in sinnar )

कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आल्यानंतर गीते कुटुंब जागे झाल्यावर बाहेर आल्यानंतर त्यांनी गोठ्यात हे दृश्य पाहताच. आरडाओरडा करताच बिबट्याने तेथून धुम ठोकली. घटनास्थळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने मदत देण्याची मागणी गिते यांनी केली आहे.

पंधरा दिवसांपासून पिंजऱ्याची मागणी

मेंढी परिसरात सतत बिबट्याचा वावर वाढत असून अनेकांना बिबट्याने दर्शन दिल्याने या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी मेंढी परिसरातील नागरिकांनी मागील 10 ते 15 दिवसांपासून वन विभागाला पिंजऱ्या लावण्याची मागणी केली असून लवकरात लवकर मेंढी गावाच्या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT