Godavari Mahaarti esakal
नाशिक

Nashik Goda Mahaarti : एकत्रित गोदाआरतीसाठी दोन्ही गट सकारात्मक; तोडगा निघण्याची शक्यता

Goda Mahaarti : एकाच वेळी व ठिकाणी चक्क दोन महाआरत्यांमुळे गोदेचा सन्मान नव्हे तर अवहेलना सुरू झाल्याची प्रतिक्रिया धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातून उमटली आहे.

दत्ता जाधव : सकाळ वृत्तसेवा

Nashik Goda Mahaarti : गत महिन्यापासून गोदावरीच्या महाआरतीला भव्यदिव्य स्वरूपात सुरवात झाली खरी, परंतु एकाच वेळी व ठिकाणी चक्क दोन महाआरत्यांमुळे गोदेचा सन्मान नव्हे तर अवहेलना सुरू झाल्याची प्रतिक्रिया धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातून उमटली आहे. महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही आरत्या एकत्रित व्हाव्यात, याबाबत पुरोहित संघ व गोदावरी सेवा समितीही सकारात्मक आहेत. (Nashik Goda Mahaartii Both groups positive for combined Goda Aarti marathi news)

त्यामुळे भविष्यात नाशिककरांच्या या प्रतिष्ठेच्या व जिव्हाळ्याच्या प्रश्‍नी तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर श्री काळाराम मंदिरासह रामतीर्थाचे महत्त्व सर्वदूर पोचले. त्यातच हरिद्वार, प्रयागच्या धर्तीवर गोदेच्या भव्यदिव्य महाआरतीसाठी उत्सुकता दाखविण्यात आली. खरेतर ही महाआरती काही वर्षांपूर्वीपासून नियमित सुरू आहे, परंतु त्यात राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी विशेष लक्ष घातल्यावर दोन हिंदुत्ववादी विचारांमध्येच महाआरतीवरून वाद पेटला.

या दोन्ही आरत्या एकत्रित होण्यासाठी पुढाकार गरजेचा असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. यातील गंगा गोदावरी पुरोहित संघातर्फे करण्यात येणारी महाआरती रामतीर्थासमोरील गंगा गोदावरी मंदिरासमोर, तर दुसरी आरती दुतोंड्या मारूतीलगत होते. परंतु हे दोन्ही कुंड शेजारीच असल्याने उपस्थित भाविकांना दोन्हीपैकी कोणतीच आरती स्पष्ट ऐकू येत नाही, हे वास्तव आहे. चांगल्या उपक्रमात राजकारण येऊ नये, अशी नाशिककरांची इच्छा आहे. ( latest marathi news )

दोन्ही बाजूही सकारात्मक

एकाच वेळी व एकाच जागी दोन महाआरत्यांमुळे गोंधळाची स्थिती निर्माण होत असल्याचे दोन्ही बाजूंकडूनही मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात दोनऐवजी एकच भव्य दिव्य आरतीचे नाशिककरांचे स्वप्न साकार होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल व गोदावरी सेवा समितीचे जयंत गायधनी हेही एकत्रित महाआरतीसाठी सकारात्मक आहेत. फक्त यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसे झाल्यास गंगेसारखाच गोदेच्याही महाआरतीचा आनंद नाशिककरांना घेता येणार आहे.

''गोदावरी मातेच्या दोन आरत्या एकावेळी होणे चुकीचेच आहे. यासाठी तोडग्यासाठी गंगा गोदावरी पुरोहित संघ व पदाधिकारी सकारात्मक आहेत.''- सतीश शुक्ल, अध्यक्ष, गंगा गोदावरी पुरोहित संघ

''एकत्रित महागोदाआरतीसाठी गोदावरी सेवा समिती दोन पावले मागे येण्यास तयार आहे. नाशिककरांच्या श्रद्धेच्या या विषयात सन्मान्य तोडगा निघणे गरजेचे आहे.''- जयंत गायधनी, अध्यक्ष, गोदावरी सेवा समिती

''गोदावरीच्या महाआरतीसाठी पुरोहित संघ व गोदावरी सेवा समिती एकत्र आल्यास नाशिकच्या दृष्टीने एक चांगला पायंडा पडेल. त्यामुळे शहराचे धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय असे एकत्रित बळही दृष्टीस पडेल.''- प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, नववर्ष यात्रा स्वागत समिती

''समिती व संघ दोघांनी मिळून महाआरती करावी, अशी गोदाप्रेमी म्हणून अपेक्षा. मतभेद टाळून ‘गोदावरी फर्स्ट’ हे धोरण ठेवल्यास कटुताही टळून समाजात चांगला संदेश जाईल.''- देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती

''दोन आरत्याऐवजी गोदावरीची एकच आरती झाल्यास ते नाशिककरांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरेल. गोदावरी सर्वांचीच असल्याने मतभेद दूर ठेवून सर्वांनी एकत्र येणे आवश्‍यक आहे.''- महंत भक्तीचरणदास, पंचमुखी हनुमान मंदिर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Satara Crime: कश्‍मिरासह चौघांकडून १४ कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Maharashtra Politics: ..तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT