watercress in Godavari River in Chandori  esakal
नाशिक

Godavari River : पानवेली कुजली पण काढली नाही; गोदाकाठ परिसरात माशांचा मृत्यू

सागर आहेर : सकाळ वृत्तसेवा

चांदोरी : गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून आ वासून उभा आहे. उन्हाळा आला की गोदावरी प्रदूषणाची तीव्रता वाढत असल्यामुळे वाढलेले प्रदूषण व पिण्यास अयोग्य बनणाऱ्या गोदावरी नदीत जलपर्णीचा विळखा वाढतच जातो. चांदोरी ग्रामपालिका दरवर्षी जमेल तेवढे प्रयत्न करीत जलपर्णी हटवून गोदावरी नदी स्वच्छ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. (Godavari River increase watercress cause death of fish)

मात्र, जलपर्णी हटवण्यासह कायमस्वरूपी हा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. गोदावरी नदीच्या प्रदूषणाकडे शासनासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कानाडोळा आहे. मात्र, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. दररोज गोदावरी नदीपात्रात याबरोबरच निर्माल्यासह कचरा, शेवाळाचा थर आदी विविध कारणांमुळे बारमाही वाहणाऱ्या गोदावरी नदीने प्रदूषणाची कमाल मर्यादा कधीच ओलांडली आहे.

प्रदूषणाबाबत तक्रारी झाल्यानंतर प्रशासनाकडून जुजबी कारवाई करण्यासह कागदी घोडे नाचवण्यात येते. त्यामुळे प्रदूषणाच्या प्रश्‍नांची मात्र ‘नेमिची येतो पावसाळा...’ अशी अवस्था बनली आहे. नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याबरोबरच जलचरांचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. जलचर मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहेत. पिण्यायोग्य पाणी नसल्याने ऐन उन्हाळ्यात काही गावांची शुद्ध पाण्यासाठी धावाधाव सुरू आहे.

त्यातच जलपर्णीच्या समस्येने पुन्हा भर घातली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात प्रवाह थांबला की सांडपाण्याचा थर वाढत जातो. त्यामुळे जलपर्णीची समस्या आणखी बिकट बनते. जलपर्णीमुळे सायखेडा-चांदोरी नदीवरील पूल त्याचबरोबर विविध गावांच्या पाणी योजनांच्या जॅकवेलला धोका निर्माण होतो. (latest marathi news)

नुकताच गोदावरी नदीत सायखेडा परिसरात सांडपाण्यामुळे नदीच्या पाण्याचा रंग बदलून दुर्गंधीयुक्त पाणी मुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहे. हे पाणी शेतीसाठी उपसा केल्यानंतर शेतकरी अलर्जी व त्वचेच्या समस्येने हैराण झाले. दारणा सांगवी पासून गोंडेगाव व तेथून पुढे नांदूर मध्यमेश्‍वरपर्यंत जलपर्णीच दिसून येत असल्यामुळे मैदानाचे स्वरूप आले होते.

प्रशासन सुस्त

जलपर्णीमुळे जलचरांना ऑक्सिजन मिळत नसल्याने जलचर तडफडून मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे फक्त नाशिक महानगरपालिका हद्दीपर्यंत जलपर्णी हटवली जात आहे. मात्र, या कामात सरकारी कामाचा फटकाही सहन करावा लागला. दैनिक सकाळच्या माध्यमातून जलपर्णी हटविण्यासाठी आवाज उठवला जात असताना प्रशासन मात्र सुस्त दिसून आले. त्यामुळे जलपर्णीचा प्रश्‍न कायमस्वरूपी कसा संपुष्टात येणार, असा प्रश्‍न आजही कायम आहे.

"पानवेलींसंदर्भात दैनिक सकाळच्या माध्यमातून अनेकदा आवाज उठवला आहे. अधिकारी येतात, पाहणी करतात आणि निघून जातात. पानवेलींमुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे." - आशपाक शेख, ग्रामपंचायत सदस्य, सायखेडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT