Gold news esakal
नाशिक

Nashik Gold Market: सोन्‍याच्‍या दरात मोठी उसळी; 74 हजार रुपये तोळ्यांवर झेप! अक्षय तृतीयेपर्यंत दरांमध्ये आणखी वाढीचा अंदाज

Nashik News : अक्षय तृतीयेपर्यंत सोन्‍याचे दर ७८ हजार रुपयांपर्यंत पोचण्याचा अंदाज सराफ व्‍यावसायिकांनी व्‍यक्‍त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून सोन्‍याच्‍या दरात सुरु असलेली तेजी कायम आहे. शुक्रवारी (ता.१२) सकाळी सोन्‍याचे दर ७१ हजार ८५० रुपये प्रति दहा ग्रॅमचे असलेले दर सायंकाळपर्यंत थेट ७४ हजार रुपयांपर्यंत पोचले होते. अक्षय तृतीयेपर्यंत सोन्‍याचे दर ७८ हजार रुपयांपर्यंत पोचण्याचा अंदाज सराफ व्‍यावसायिकांनी व्‍यक्‍त केला आहे. (nashik Gold Price Hike news)

आंतरराष्ट्रीय स्‍तरावरील घडामोडींसह, भांडवल बाजारात ईटीएफ गोल्‍डमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झालेली असल्‍याने सोन्‍याच्‍या दरांमध्ये मोठी तेजी बघायला मिळत असल्‍याचे निरीक्षण सराफ व्‍यावसायिकांनी नोंदविले आहे. तसेच अमेरिकन फेडरल बँकेने व्‍याजाच्‍या दरांसंदर्भात घेतलेल्‍या निर्णयाचा प्रभाव असल्‍याचेही व्‍यावसायिकांचे म्‍हणणे आहे.

दरम्‍यान शुक्रवारी सकाळी सोन्‍याचे दर ७१ हजार ८५० रुपये प्रति दहा ग्रॅम इतके होते. मात्र सायंकाळपर्यंत हे दर ७४ हजार रुपयांपर्यंत पोचले. आगामी लग्‍न सोहळा, सण उत्‍सवांच्‍या पार्श्वभूमीवर सोन्‍याच्‍या दरात तेजी कायम राहणार असल्‍याचा अंदाज वर्तविला जातो आहे. या पार्श्वभूमीवर येत्‍या अक्षयतृतीयेपर्यंत सोन्‍याचे दर ७८ हजार रुपयांपर्यंत तर नजीकच्‍या काळात ऐंशी हजार रुपयांपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे.  (latest marathi news)

चोख सोने खरेदीवर भर

सध्या सराफी पेढ्यांमध्ये लग्‍नसराईनिमित्त सोने खरेदी सुरु असल्‍याचे बघायला मिळत आहे. यासोबत अनेक ग्राहकांकडून चोख सोन्‍याची खरेदी केली जाते आहे. यामध्ये वेढा, बिस्‍कीट, कॉइन या स्वरूपात सोने खरेदी होत असल्‍याचे व्‍यावसायिकांचे म्‍हणणे आहे.

"विविध कारणांनी सोन्‍याच्‍या दरांमध्ये वाढ झाली असून, ही तेजी कायम राहणार आहे. त्‍यामुळे गुंतवणुकीच्‍या उद्देशाने तसेच आगामी लग्‍नसराईच्‍या पार्श्वभूमीवर सोने खरेदीची संधी ग्राहकांना उपलब्‍ध आहे. अल्‍प कालावधीत चांगला परतावा मिळत असल्‍याने गुंतवणूकदारांकडून सोने खरेदीवर भर आहे." - मयूर शहाणे, संचालक, मयूर अलंकार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार राहणार बंद; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT