Nashik News : एकीकडे सरकारी नोकरी मिळत नसल्याची ओरड तरुणांमध्ये नेहमीच ऐकायला मिळत असताना कळवण येथील शीतल धर्मा पगार हिने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एकाचवेळी सरकारी नोकरीच्या चार परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवले. (nashik Got government job by clearing 4 exams simultaneously of sheetal pagar marathi news)
येथील एसटी महामंडळाचे निवृत्त वाहक धर्मा पगार यांची कन्या शितलने खासगी नोकरी करीत जिद्द व मेहनतीने दिवस-रात्र अभ्यास करून केंद्रीय राखीव दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ, संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ व महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागात रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदावर निवड झाली.
शितल महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागात रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून देवळा तालुक्यात रुजू झाली आहे. शितलचे प्राथमिक शिक्षण शासकीय जि. प. मराठी शाळेत झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मानूर जनता विद्यालयात झाले. बारावीनंतर ‘सीईटी’ व ‘जेईई’ला चांगले गुण असल्याने फार्मसी व इंजिनिअरिंग पर्याय समोर होते. (latest marathi news)
मात्र, घरची परिस्थिती जेमतेम असल्याने शितलने मानूर येथील आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजमध्ये बीएसस्सीपर्यंत शिक्षण घेतले. प्राचार्य बी. एस. पगार व सिद्धिदाता हॉस्पिटलचे संचालक डॉ. पोपट पाटील यांनी डीएमएलटीत पदवी घेण्याचा सल्ला दिला. धन्वंतरी कॉलेज नाशिक येथे डीएमएलटीत पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण होताच नाशिक येथील डॉ. राजोळे पॅथॉलॉजी लॅबमध्ये टेक्निशियन म्हणून नोकरी सुरु केली. यावेळी चांगला पगार व डॉ. राजोळे यांचे मार्गदर्शन लाभले. मिळालेल्या पगारात लहान भावंडांचे शिक्षण पूर्ण करणे सोपे झाले. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केला.
''मला मिळालेल्या यशाचे श्रेय माझ्या मार्गदर्शकांना व माझ्या परिवाराला जाते. माझ्यासारख्या परीक्षार्थींना मी एकच संदेश देऊ इच्छिते की, यशस्वी होण्यासाठी भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली इच्छाशक्ती असायला हवी.''- शीतल पगार, कळवण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.