non-veg dish esakal
नाशिक

Nashik News : दीप अमावास्येचे औचित्य साधत खवय्यांचा ‘नॉनव्हेज’वर ताव

Nashik : मटण खरेदी करण्यासाठी अक्षरशः रांगा लागल्या होत्या. दर सातशेपार होऊनही शहर व उपनगरांत लाखो रुपयांची उलाढाल झाली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आषाढ अर्थात दीप अमावास्येचे औचित्य साधत रविवारी (ता.४) अनेकांनी नॉनव्हेजलाच पसंती दिली. खवय्यांची पसंती चिकनपेक्षा बोकडाच्या मटणालाच अधिक राहिल्याने अनेक ठिकाणी मटण खरेदी करण्यासाठी अक्षरशः रांगा लागल्या होत्या. दर सातशेपार होऊनही शहर व उपनगरांत लाखो रुपयांची उलाढाल झाली. दीप अमावस्या अन नॉनव्हेज यांचे जणू समीकरणच ठरल्याने यादिवशी बोकडाचे मटण, चिकन, मच्छी यांना मोठी मागणी असते. (Gourmets are keen on Non Veg to celebrate Deep Amavasya )

मात्र चिकन व मच्छीपेक्षा अनेकांनी बोकडाच्या मटणालाच अधिक पसंती दिल्याने दुपारपर्यंत मटण घेण्यासाठी अनेक ठिकाणी अक्षरशः रांगा लागल्या होत्या. पावसामुळे गतवर्षीपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याचे अनेक विक्रेत्यांनी सांगितले. या विक्रेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून व्यवसायासाठी मोठी तयारी केली होती. मात्र भावाने उसळी घेऊनही खवय्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. विक्रेत्यांनीही ही संधी हेरत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. पंचवटीसह शहरातील दुकानांत मोठी गर्दी उसळली होती. मागणी लक्षात घेत अनेकांनी रस्त्यालगत तात्पुरती दुकाने उभी केली होती. (latest marathi news)

नॉनव्हेजचे दर पुढीलप्रमाणे -

बोकडाचे मटण - ७०० ते ८००

चिकन (तयार) -

गावठी - ३०० ते ३५०

बॉयलर - २०० ते २२०

अंडी - ७२ रुपये डझन.

पापलेट- १३०० रु. किलो.

वाम - १३००

रावस - १२००

सुरमई - १३०० ते १५००

कोळंबी - ६४०

खवय्यांच्या मेसेजची रंगत

दरम्यान दीप अमावास्येचे औचित्य साधत अनेकांचे मजेशीर व्हिडिओ व बातम्या समाजमाध्यमावर व्हायरल झाले होते. यात काही रंगतदार व्हीडीओंसह नॉनव्हेज आरोग्यासाठी किती व कसे आवश्‍यक आहे, याबाबतच्या बातम्यांनी अनेकांचे मनोरंजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT