Satyajeet Tambe Family esakal
नाशिक

Satyajeet Tambe : तांबे कुटुंबीयांचा करिश्‍मा निर्णायक

लेखक : डॉ. राहुल रनाळकर

काँग्रेसचा एबी फॉर्म मिळूनही डॉ. सुधीर तांबे यांनी स्वतःऐवजी मुलगा सत्यजित तांबे यांना उभे करण्याचा निर्णय घेतला. कॉंग्रेसला (Congress) हे मान्य झाले नव्हते. त्यामुळे राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून अखेर अपक्ष सत्यजित तांबे यांनी तब्बल २९ हजारांच्या फरकाने बाजी मारली आहे.

डॉ. सुधीर तांबे यांचा दांडगा जनसंपर्क आणि पाचही जिल्ह्यांतील मजबूत नेटवर्क यामुळे डॉ. तांबे यांचा करिश्‍मा, वैयक्तिक संपर्क आणि सत्यजित यांनीही विकसित केलेले कार्यकर्त्यांचे जाळे यामुळे हे यश मिळाले.

महाविकास आघाडीने (MVA) ऐनवेळी उडी घेत चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी तोच त्यांच्या अंगाशीही आला आहे. अपक्षाने महाविकास आघाडीला धूळ चारली असून, काँग्रेसनेही आत्मपरिक्षण करावे, असा संदेश यातून गेला आहे. (Nashik Graduate Constituency Satyajeet tambe sudhir tambe shubhangi patil congress bjp Mva Maharashtra Political News)

‘नाशिक पदवीधर मतदारसंघ’ हा तसा आधीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला. सुधीर तांबे यांनी येथील पदवीधरांचे प्रश्‍न, शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. काँग्रेस सरकारने २००५मध्ये बंद केलेली जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी ते प्रथमपासून आग्रही राहिले आहेत आणि हा प्रश्‍न सोडविण्याचे अभिवचनही त्यांनी दिले.

त्यांचे नेटवर्क मजबूत आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःऐवजी मुलाला, तरुण पिढीला संधी देण्याचे जाहीर केले, तेव्हाही शिक्षकांच्या मोठ्या गटाने त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला, यातच त्यांचे यश आणि सत्यजित यांचा अर्धा विजय निश्‍चित झाला होता. दिवसागणिक सत्यजित यांना शिक्षक संघटनांचा पाठिंबा वाढत गेला. त्याला कारण होते, ते संघटन.

खरे तर काँग्रेसने सुरवातीलाच माघार घेत अपक्ष सत्यजित तांबे यांनाच पाठिंबा देण्याची चाल खेळली असती, तर डॉ. तांबे यांचा वैयक्तिक करिष्म्याचा फायदा पक्षाला मिळवता आला असता. एबी फॉर्मचा घोळ झाल्याचे मतदारांसमोर मांडले असते तर सहानुभूतीची लाट काँग्रेसकडेही वळली असती. मात्र काँग्रेसने थेट दोघांचे निलंबन करून ‘बुडत्याचे पाय खोलात’, ही म्हण सार्थ ठरविली. अजूनही दरबारी राजकारणातून काँग्रेस बाहेर पडू इच्छित नाही, हे स्पष्ट झाले.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

भाजपने (BJP) या मतदारसंघात उमेदवार न देता एकप्रकारे अपक्ष सत्यजित तांबे यांना चाल दिल्याची चर्चाही सुरवातीपासून होती, मात्र निकालावरून तसे दिसत नाही. भाजपच्या काहींनी प्रत्येक जिल्ह्यात छुप्या पद्धतीने मदत केली असली तरी ती डॉ. तांबे यांच्या असलेल्या वैयक्तिक संपर्कातून झालेली असावी, एवढेच म्हणता येईल.

भाजपने उमेदवारी न दिल्याने धुळ्याच्या शुभांगी पाटील यांनी ऐनवेळी महाविकास आघाडीचा झेंडा हाती घेतला, मात्र सुरवातीपासून त्यांनी भाजपशी केलेला घरोबा ऐनवेळी मोडल्याचा संदेश यातून गेला आणि त्याचा फटका त्यांना बसला.

भाजपचे मतदार असलेल्या अनेक शिक्षक आणि पदवीधरांना ते रुचले नाही. शिवाय भाजपच्या शिस्तीत शुभांगी पाटील काम करू शकणार नाहीत, असा प्रचारही करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तसेच भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी ही बाब खासगीत बोलून दाखविली होती. त्याचे पडसाद मतदानात पडले नसावेत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुका यावेळी अत्यंत प्रतिष्ठेच्या केल्या गेल्या. भाजप आणि मविआ यांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. या निकालांचा अन्वयार्थ आणि या निमित्ताने पुढे आलेल्या प्रश्नांची चर्चा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT