Nashik Police Recruitment esakal
नाशिक

Nashik Police Recruitment : पोलिस शिपाई भरतीसाठी पदवीधरांनीही आजमावले नशिब; बेरोजगारीची दाहकता

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Recruitment : गेल्या दहा दिवसांपासून शहर आयुक्तालयातील रिक्त पोलिस शिपाई पदासाठीची मैदानाची चाचणी सुरू होती. यासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी असताना, सुमारे अडीच हजार युवक हे पदवीधर होते. तर, इंजिनिअरिंग, एलएलबी, ॲग्री, फार्मसीसह व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या युवकांनीही ‘पोलिस शिपाई’ होण्यासाठी चाचणीत पात्र ठरण्यासाठी मैदानावर घाम गाळत नशिब आजमावले आहे. यावरून युवा वर्गातील बेरोजगारीची दाहकता अधोरेखित होते आहे. (Graduates also try their luck for police constable recruitment)

महाराष्ट्र पोलिस दलातील रिक्त शिपाई पदासाठी भरतीची प्रक्रिया गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे. लोकसभा निवडणुकीमुळे भरती रेंगाळली होती. मैदानी चाचणीला प्रारंभ झाल्याने भरतीची तयारी करणार्या युवकांमध्ये उत्साह होता. नाशिक शहर पोलिस दलात शिपाई पदांच्या ११८ रिक्त जागांसाठीची रविवारी (ता.३०) मैदानी चाचणी पूर्ण झाली.

यासाठी ५ हजार ५९० पुरुष, २ हजार १२५ महिला व दोन तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले होते. नाशिक शहर पोलिस दलात शिपाई पदांच्या ११८ रिक्त जागांसाठीची रविवारी (ता.३०) मैदानी चाचणी पूर्ण झाली. यासाठी ५ हजार ५९० पुरुष, २ हजार १२५ महिला व दोन तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले होते. पोलिस शिपाई पदासाठी किमान १२ वी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आहे.

मात्र, शहर आयुक्तालयाकडे आलेल्या अर्जांमध्ये सुमारे साडेचार हजार अर्ज हे बारावी उत्तीर्ण युवकांचे जसे होते, तसेच सुमारे अडीच हजार पदवीधर असलेल्या युवकांचेही अर्ज आलेले होते. एवढेच नव्हे तर, साडेपाचशे युवकांनी पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे. याशिवाय, इंजिनिअरिंग, ॲग्री, वकिलीसह व्यावसायिक शिक्षण घेणार्या युवकांनीही पोलिस दलातील शिपाई पदासाठी अर्ज करीत आपले नशिब आजमावत असून, यावरून युवा वर्गातील रोजगाराची समस्या समोर आली आहे. (latest marathi news)

मैदानी चाचणीसाठी धावले

गेल्या १९ जूनपासून पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडिअमवर आयुक्तालयातर्फे मैदानी चाचणी घेण्यात आली. पुरुषांसाठी छाती-उंचीनंतर गोळाफेक, १०० मी. व १६०० मी. धावण्याची चाचणी होती तर महिलांसाठी उंची, गोळाफेक, १०० मी. व ८०० मी. धावण्याची चाचणी बंधनकारक होती. मात्र, पदवी, पदव्युत्तर, इंजिनिअर, फार्मसी, एलएलबी, ॲग्री यासह व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या युवकांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेचा विचार न करता पोलीस शिपाई होण्यासाठीच्या या मैदानी चाचणीला सामोरे गेले.

लेखीची प्रतिक्षा

रिक्त जागांच्या तुलनेत प्रत्येक जागेकरीता दहा उमेदवार यानुसार पुढील दोन दिवसांत लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. ७ हजार ७१७ पैकी दोनशेपेक्षा जास्त उमेदवार मैदानी चाचणी छाती व उंचीच्या निकषांमध्ये अपात्र ठरले आहेत.

तृतीयपंथी ठरले पात्र

मैदानी चाचणीसाठी १९ ते २९ या तारखेदरम्यान ज्यांना काही कारणास्तव येता आले नाही, त्यांच्यासाठी रविवारी (ता.३०) एक संधी आयुक्तालयाने दिली होती. त्यानुसार, रविवारी ५४ उमेदवार मैदानी चाचणीसाठी हजर होते. यात ५० महिला-पुरुष, २ तृतीयपंथी व २ माजी सैनिक होते. यातील ५ उमेदवार उंचीत अपात्र ठरले. ४९ उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली त्यात ते पात्र ठरले. यात तृतीयपंथी दोघा उमेदवारांचाही समावेश आहे.

शिक्षण : उमेदवारांची संख्या

बारावी : ४,७६१

पदवीधर : २,४११

पदव्युत्तर : ५४५

बीई इंजिनीअर : १००

एलएलबी : ३

बी.एड. : ३

इंटेरिअर डिझायनर : १

बी.एसस्सी ॲग्री : ३६

बी.फार्मसी : १३

हॉटेल मॅनेजमेंट : ४

शिपाई पदासाठी किमान १२ वी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आहे. मात्र, शहर आयुक्तालयाकडे आलेल्या अर्जांमध्ये सुमारे साडेचार हजार अर्ज हे बारावी उत्तीर्ण युवकांचे जसे होते, तसेच सुमारे अडीच हजार पदवीधर असलेल्या युवकांचेही अर्ज आलेले होते. एवढेच नव्हे तर, साडेपाचशे युवकांनी पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे. याशिवाय, इंजिनिअरिंग, ॲग्री, वकिलीसह व्यावसायिक शिक्षण घेणार्या युवकांनीही पोलीस दलातील शिपाई पदासाठी अर्ज करीत आपले नशिब आजमावत असून, यावरून युवा वर्गातील रोजगाराची समस्या समोर आली आहे.

मैदानी चाचणीसाठी धावले

गेल्या १९ जूनपासून पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडिअमवर आयुक्तालयातर्फे मैदानी चाचणी घेण्यात आली. पुरुषांसाठी छाती-उंचीनंतर गोळाफेक, १०० मी. व १६०० मी. धावण्याची चाचणी होती तर महिलांसाठी उंची, गोळाफेक, १०० मी. व ८०० मी. धावण्याची चाचणी बंधनकारक होती. मात्र, पदवी, पदव्युत्तर, इंजिनिअर, फार्मसी, एलएलबी, ॲग्री यासह व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या युवकांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेचा विचार न करता पोलीस शिपाई होण्यासाठीच्या या मैदानी चाचणीला सामोरे गेले.

लेखीची प्रतिक्षा

रिक्त जागांच्या तुलनेत प्रत्येक जागेकरीता दहा उमेदवार यानुसार पुढील दोन दिवसांत लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. ७ हजार ७१७ पैकी दोनशेपेक्षा जास्त उमेदवार मैदानी चाचणी छाती व उंचीच्या निकषांमध्ये अपात्र ठरले आहेत.

तृतीयपंथी ठरले पात्र

मैदानी चाचणीसाठी १९ ते २९ या तारखेदरम्यान ज्यांना काही कारणास्तव येता आले नाही, त्यांच्यासाठी रविवारी (ता.३०) एक संधी आयुक्तालयाने दिली होती. त्यानुसार, रविवारी ५४ उमेदवार मैदानी चाचणीसाठी हजर होते. यात ५० महिला-पुरुष, २ तृतीयपंथी व २ माजी सैनिक होते. यातील ५ उमेदवार उंचीत अपात्र ठरले. ४९ उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली त्यात ते पात्र ठरले. यात तृतीयपंथी दोघा उमेदवारांचाही समावेश आहे.

शिक्षण : उमेदवारांची संख्या

बारावी : ४,७६१

पदवीधर : २,४११

पदव्युत्तर : ५४५

बीई इंजिनीअर : १००

एलएलबी : ३

बी.एड. : ३

इंटेरिअर डिझायनर : १

बी.एसस्सी ॲग्री : ३६

बी.फार्मसी : १३

हॉटेल मॅनेजमेंट : ४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fireworks Accident: गणपती विसर्जनात फटाक्याची आतिषबाजीमुळे 11 महिला ढोलवादक जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर! मंडळावर कारवाईची मागणी

Pune Firing: खानापूर गोळीबार प्रकरणातील जखमी तरुणाचा मृत्यू, गावात पोलिस बंदोबस्त वाढवला

On This Day: अफगाणिस्तानचा 'करामती' खान! राशिदने फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नाही, तर IPL, BBL अन् CPL मध्येही घेतली हॅट्रिक

Latest Marathi News Updates : Apple चा iPhone 16 खरेदीसाठी मुंबईत 'ॲपल स्टोअर'च्या बाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी

Palak Paneer Dosa: सकाळी नाश्त्यात बनवा चवदार पालक पनीर डोसा, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT