Grapes esakal
नाशिक

Nashik Grapes Rates Hike: हंगामाच्या मध्यावर द्राक्षाच्या दराला गोडवा! नाशिक जिल्ह्यातून 15 हजार टन द्राक्ष परराज्यात

Nashik News : यंदा हंगामाच्या प्रारंभी द्राक्षांचे दर तळाला असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली होती.

एस. डी. आहिरे

पिंपळगाव बसवंत : यंदा हंगामाच्या प्रारंभी द्राक्षांचे दर तळाला असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. सध्या द्राक्ष हंगाम मध्यावर आला असून, दरात गोडवा येत आहे. विशेष म्हणजे स्पर्धेक फळ बाजारातही द्राक्षांच्या दरात मोठी तेजी आली आहे. स्थानिक बाजारपेठेतील द्राक्षांना किलो मागे १० ते १५ रुपयांची तेजी येऊन दर ३५ ते ४० रुपये किलोपर्यंत पोचले आहेत. नाशिक जिल्ह्यातून रोज १५ हजार टन द्राक्ष परराज्यात पोचत आहेत. (Nashik Grapes rate hike mid season 15 thousand tons export from district to abroad marathi news)

नववर्षाच्या प्रारंभापासून रसाळ द्राक्ष खवय्याच्या जीभेवर गोड चव पेरण्यासाठी येतात. मागील चार वर्षांप्रमाणेच यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरले. परिक्वव होत असलेल्या द्राक्षांना गारपीटीने तडाखा दिला. ३० टक्के द्राक्षांचे नुकसान झाले.

त्या संकटाशी झुंज देत शेतकऱ्यांनी द्राक्ष पीक घेतले. जानेवारीच्या प्रारंभी द्राक्ष काढणीला आली, तेव्हा परराज्यातील थंडीने द्राक्षाला अत्यल्प मागणी राहिली. त्यामुळे दर हंगामाची सुरवात निराशाजनक राहिली.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात तेरात तेजी

नाशिक जिल्ह्यात पावणेदोन लाख हेक्टरवर निफाड, दिंडोरी, नाशिकसह परिसरात द्राक्षांच्या बागा फुलल्या आहेत. सुमारे १२ लाख टन द्राक्षांचे उत्पादन हंगामात होते. यंदा हंगाम मध्यावर आला आहे. प्रारंभी २० ते २५ रुपये किलोने व्यापाऱ्यांंनी द्राक्षांचे सौदे केले.

वाढते तापमान, रमजानसह येत असलेल्या सणांमुळे परराज्यात द्राक्षांचा उठाव वाढला आहे. बांग्लादेशला द्राक्ष निर्यात होऊ लागल्याने दरात तेजी येण्यासाठी पूरकस्थिती निर्माण झाली. त्यामुळे थॉमसन, सोनाका वाणाचे दर प्रतिकिलो ३५ ते ४० रुपयांनी व्यापाऱ्यांकडून खरेदी होत आहे.

त्यामुळे नेहमीच टक्कर देणारे संत्रा, आंबा, टरबूज या स्पर्धेक फळांवरही द्राक्षाने यंदा मात केल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यातून पिंपळगाव बसवंत, उगाव, वडनेर भैरव, दिंडोरी, गिरणारे भागातून रोज ८०० ट्रकमधून १५ हजार टन द्राक्ष परराज्यात पोचत आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधीक मागणी असून, त्यापाठोपाठ कलकत्ता, दिल्ली, बिहार, आसाम, पंजाब, गुजरात येथे नाशिकची द्राक्षे भाव खात आहेत. (latest marathi news)

सुरवातीला व्यापाऱ्यांच्या मागे द्राक्षाचे सौदे करण्यासाठी शेतकऱ्यांना फिरावे लागत होते. आता मागणी वाढल्याने व्यापारी शेतकऱ्याच्या बांधावर घिरट्या मारत आहेत. ठकबाज व्यापाऱ्यांपासून सावधगीरी बाळगत शेतकरी रोख पेमेंटचा आग्रह धरत आहे. पट्टी कटींग पद्धतीने रोख स्वरूपाचे सौदे होत आहेत.

"दरात तेजी आल्याने उशिराने छाटणी केलेल्या द्राक्ष उत्पादकांना दिलासा मिळाला. आव्हानात्मक परिस्थितीत दरातील सुधारणा शेतकऱ्यांसाठी आधार ठरेल. बांग्लादेशात निर्यातीचा निर्णय लवकर झाला असता, तर ही तेजी अगोदर आली असती."

-शंकरराव बनकर, द्राक्ष उत्पादक

"द्राक्षांच्या दरात तेजी आल्याने मोठ्या प्रमाणात द्राक्ष परराज्यात पाठविली जात आहेत. द्राक्ष पोचविण्यासाठी लागणाऱ्या ट्रकचा सध्या तुटवडा आहे. परतीचे भाडे मिळत नसल्याने हा तुटवडा आहे. त्याचा परिणाम भाड्यामध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे."

-अरुण लभडे, किरण शेळके, न्यू भगवती ट्रान्सपोर्ट, पिंपळगाव बसवंत

"सणाचे दिवस सुरू होत आहे.त्यातच तापमानात वाढ झाल्याने द्राक्षाची मागणी वधारली आहे.हे दर टिकुन राहतील किवा यात अजुन तेजी येऊ शकते."

-संतोष निकम, रूचा फ्रूट, पिंपळगांव बसवंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT