नाशिक : गंगापूर धरणातून बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जीर्ण झालेल्या सिमेंट पाइपलाइनमुळे पाणी गळतीबरोबरच वांरवार शहराचा पाणीपुरवठा खंडित होत असल्याने सिमेंटऐवजी लोखंडी पाइपलाइन टाकण्याच्या कामाला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. सिंहस्थापूर्वी जवळपास बारा किलोमीटर लांबीपर्यंत पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. (Nashik Green light for Gangapur Bara bungalow direct pipeline marathi news)
१ टक्का न्यूनतम दर भरल्याने जिंदाल या आंतरराष्ट्रीय कंपनीला काम मिळाले आहे. नाशिक शहराला मुख्यत्वे गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होतो. गंगापूर धरणातून पंपिंग स्टेशनद्वारे पाणी उचलले जाते. तिथून बारा बंगला शुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी पाणी आणले जाते.
महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने पाणी वाहण्यासाठी १९९७ ते २००० या कालावधीत बाराशे मिलिमीटर व्यासाच्या दोन सिमेंटच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणून तेथे शुद्ध करून पुढे जलकुंभाच्या माध्यमातून घरोघरी पाणी वितरित केले जाते.
२०२१ मध्ये नाशिक महापालिकेने पाणीपुरवठ्याचा आराखडा तयार केला. त्यात सध्या अस्तित्वात असलेली जलवाहिनी अपुरी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्याचबरोबर सिमेंटची जलवाहिनी असल्याने वारंवार पाणी गळती होऊन पाणीपुरवठा बंद करावा लागतो.
त्यामुळे गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र या दरम्यान ४२५ दशलक्ष लिटर क्षमतेची साडेबारा किलोमीटर लांबीची १८०० मिलिमीटर व्यासाची नवीन लोखंडी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पंधराव्या वित्त आयोगातून निधी
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून जलवाहिनीसाठी निधी मंजूर केला. प्रकल्पासाठी २०४ कोटी ३८ लाख रुपये खर्च सुरवातीला धरण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता दिली होती. परंतु, महापालिकेने तयार केलेल्या पाणीपुरवठा आराखड्यानुसार साडेबारा किलोमीटरची जलवाहिनी टाकल्यास २०५५ पर्यंतच्या लोकसंख्येच्या आणि प्रश्न निकाली निघणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.