Teachers Recruitment  esakal
नाशिक

Teachers Recruitment : पवित्र शिक्षक भरतीला हिरवा कंदील; शिक्षकांना पदस्थापना देण्याची मागणी

Nashik News : शिक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शिक्षक पदभरतीबाबतची प्रक्रिया राबविण्यास शिक्षण विभागाकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे.

प्रशांत बैरागी : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पवित्र संकेतस्थळातर्फे राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शिक्षक पदभरतीबाबतची प्रक्रिया राबविण्यास शिक्षण विभागाकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे. त्यामुळे २५ फेब्रुवारीला प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करणे शक्य होणार आहे.

शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे भावी शिक्षकांचे चेहरे आनंदाने खुलले आहेत. दरम्यान, नवीन शिक्षक भरतीपूर्वी जिल्हा बदलाने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. जिल्ह्यात शिक्षकांची हजारो पद रिक्त असल्याने ज्ञानदान करताना शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया जिल्हा परिषदेत सुरू असून, मुख्याध्यापक पदोन्नती झाल्यानंतर शिक्षकांच्या रिक्त पदांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मार्चपासून जिल्हा बदल्या झाल्यानंतर सुमारे ७२ शिक्षक टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषदेत रुजू झाले आहेत. परंतु अद्यापही त्यांना पदस्थापना न दिल्याने जिल्हा परिषदेत कारकुनी कामे करावी लागत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

१५ जूनपूर्वी जिल्हा बदलीने हजर झालेल्या शिक्षकांना पदस्थापना द्यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष युवराज पवार, विभागीय अध्यक्ष पृथ्वीबाबा शिरसाठ, जिल्हाध्यक्ष बाजीराव सोनवणे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे केली आहे. (latest marathi news)

उमेदवारांना दिलासा

शिक्षक भरती प्रक्रियेत ११ हजार ८५ पदांवर उमेदवारांची निवड झाली. परंतु राज्यात लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीमुळे शिक्षक भरती प्रक्रियेतील निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया रखडली होती. मात्र, आयोगाने लोकसभा निवडणुकीचे मतदान झालेल्या जिल्ह्यांत शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया करण्यास परवानगी दिली.

लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवणुका जाहीर झाल्याने या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नियुक्ती प्रक्रिया आणखी पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्‍वभूमीवर शिक्षक भरती प्रक्रियेला मान्यता मिळाल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयांप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालकांनी संबंधित कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे.

तसेच, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

"पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल, अशी कोणतीही कृती घडणार नाही. याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीबाबतची प्रक्रिया राबविण्यास मान्यता मिळाली आहे. २५ फेब्रुवारीला प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल." - सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT