Rural Police Recruitment esakal
नाशिक

Nashik Police Recruitment: पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी उद्यापासून! भरती प्रक्रियेसाठी शहर-ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Recruitment : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला अखेर बुधवारपासून (ता. १९) प्रारंभ होत आहे. यासाठी शहर पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस सज्ज झाले असून, मैदानी चाचणीपूर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरतीची मैदानी चाचणी पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडिअम तर, नाशिक ग्रामीणची मैदानी चाचणी आडगाव ग्रामीण मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. दरम्यान, मैदानी चाचणीत पावसाचा व्यत्यय आल्यास त्या दिवसाची भरती राखीव दिवशी घेतली जाणार आहे. (Nashik ground Test for Police Recruitment from Tomorrow)

शहर पोलिस दलाच्या भरतीसाठी आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये मुख्यालय उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी भरती प्रक्रियेचे नियोजन केले आहे. तर, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव हे मैदानाबाहेरील बंदोबस्ताचे प्रभारी आहेत. याचप्रमाणे, नाशिक ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या सूचनेनुसार आडगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचणीचे नियोजन करण्यात आलेले आहे. शहर व ग्रामीण पोलीस शिपाई पदासाठीच्या मैदानी चाचणीला बुधवारीपासून (ता. १९) प्रारंभ होत आहे.

- उमेदवारांना पहाटे ५ वाजता मैदानावर हजर राहण्याच्या सूचना

- उमेदवारांची बायोमॅट्रिक हजेरीनंतर हॉल तिकिटची तपासणी

- उमेदवारांना चेस्ट क्रमांक वितरण

- त्यानंतर उमेदवारांची शारीरिक उंचीचे मोजमाप

- उंचीच्या पात्रतेनंतर कागदपत्रांची तपासणी

- उमेदवारांची छाती फुगवून व न फुगवून मोजमाप

मैदानी चाचणीची सज्जता

- शहर पोलिसांतर्फे मैदानी चाचणी : स्थळ : मीनाताई ठाकरे स्टेडिअम, हिरावाडी

- ग्रामीण पोलिसांतर्फे मैदानी चाचणी : स्थळ : पोलिस कवायत मैदान, आडगाव

- गोळाफेक : १५ गुण

- शंभर मीटर धावणे : १५ गुण

- १६०० मीटर धावणे (पुरुष) : २० गुण

- ८०० धावणे (महिला) : २० गुण

एकूण पदे व उमेदवारी अर्ज

* शहर - ११८ पदे :

पुरुष - ६,०७५

महिला - २,२४८

तृतीयपंथी - २

एकूण : ८,३२५

(latest marathi news)

* नाशिक ग्रामीण - ३२ पदे

पुरुष - २,६०२

महिला - ५७६

माजी सैनिक - ४२

माजी सैनिकावर अवलंबित - ५

एकूण : ३,२२५

"शहर पोलीस शिपाई भरतीसाठी मैदानी चाचणी बुधवारपासून सुरू होत आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली असून, उमेदवारांना अडचणी वा अपिल असेल ते थेट अपिल करू शकतील. पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे."

- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, मुख्यालय शहर.

"आडगाव येथील नाशिक ग्रामीण मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. परजिल्ह्यातून येणार्या उमेदवारांच्या निवासाची सोय मुख्यालयात करण्यात आलेली आहे. पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे."

- आदित्य मिरखेलकर, अपर पोलिस अधीक्षक, ग्रामीण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Handore Son Arrested : काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाला अटक! शुगर वाढल्याने रुग्णालयात केलं दाखल

जिनिलियाने सासूबाईंबरोबर केली नवरात्रीची पूजा ! देशमुखांच्या सुनांचं होतंय कौतुक

Latest Marathi News Live Updates: हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक असणारे नितेश राणे आता संविधानाच्या मुद्द्यावरही आक्रमक

Kolhapur : घरातून भूतपिशाच्च घालवतो सांगून कोल्हापुरात वृद्धाला 85 लाखांचा गंडा; भोंदू, बुवांवर विश्वास ठेवणे बनले धोकादायक

Irani Cup Winner : मुंबई संघाने २७ वर्षानंतर जिंकला इराणी चषक; Tanush Kotian च्या शतकाने शेष भारताच्या स्वप्नांचा केला चुराडा

SCROLL FOR NEXT