नाशिक : यज्ञ- यागादी कर्मातून जीवनात नवचैतन्य प्राप्त होतो. त्यामुळे प्रत्येकजण यथाशक्ती भक्तिभावाने यज्ञादी कर्म करत आहेत. विशेषतः दुःख, रोग, दारिद्र्यात तसेच मनोवांचित फलप्राप्तीसाठी यज्ञ केले जातात. धार्मिकनगरी नाशिकमध्ये यज्ञाला लागणारी आवश्यक सामग्री अन् यज्ञपात्र किंवा यज्ञकुंड सहजपण उपलब्ध होणाऱ्या बाजारपेठेचे जाळे वाढत असून, दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण करण्यास हातभार लावत आहे. (Nashik inceasing sell yadnya material marath)
यज्ञविधी मोठा असो की, लहान. यज्ञाला लागणारी आवश्यक सामग्री अन् यज्ञपात्र किंवा यज्ञकुंड सहजपण उपलब्ध होणारी बाजारपेठ रामतीर्थ, भांडी बाजार परिसरात विस्तारली आहे. बाहेरून येणाऱ्या भाविकाने दर्शन घेतले की, पूजाअर्चेसाठी लागणारे साहित्य, धार्मिक ग्रंथ, यज्ञकुंडे, यज्ञाला लागणारी हवन सामग्री, देव-देवतांच्या प्रतिमा, टाक, मूर्ती घेण्यासाठी असं साहित्य उपलब्ध असलेल्या दुकानात जाऊन खरेदी करतो.
अग्निहोत्र, गायत्री यज्ञांबरोबर अन्य यज्ञांसाठी लागणारी यज्ञकुंडे, यज्ञाशी संबंधित वस्तू, हवन सामग्रीतील लागणारे सर्वकाही साहित्य येथे मिळते. यज्ञाचे नित्य, नैमित्तिक, काम्य असे प्रकार असून यज्ञासाठी लागणाऱ्या वस्तू योग्य दरात उपलब्ध आहेत. रामतीर्थ, भांडी बाजार परिसरात पूजाअर्चा, यज्ञसामग्री, धार्मिक ग्रंथ मिळणारी काही दुकाने आहेत.
अनेकांना मोठे यज्ञ सहजपणे करणे शक्य नसते, अशावेळी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली छोटे यज्ञकुंड घेतले जाते. पूर्वीसारखे यज्ञकुंड तयार करण्यासाठी लागणारे कौशल्य अनेकांकडे नाही हे वास्तव्य आहे; मात्र घरात अग्निहोत्र असो की, अन्य छोटे यज्ञ करण्यासाठी चार ते सहा इंच तर पुरोहित जे यज्ञ करतात, त्याकरिता १० ते २४ इंचापर्यंत तांब्याच्या धातूची यज्ञकुंड मात्र मिळतात. वर्षभर या बाजारपेठेत आर्थिक उलाढाल सुरू असते. (Latest Marathi News)
अनेक ब्रॅन्डेड कंपन्या स्पर्धेत
ऑनलाइन सेवेतून देशाच्या कुठल्याही भागातून धार्मिक साहित्य सहज मागविता येणे शक्य झाले. धार्मिक वस्तूंच्या निर्मितीत अनेक ब्रॅन्डेड कंपन्याही उतरल्या आहेत. अनेक कंपन्याच आता थेट भाविकांशी जोडल्या आहेत. त्यामुळे अनेकदा धार्मिक दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन खात्रीशीर खरेदी करणे सोपे झाले. धार्मिक पर्यटनातील वस्तूंच्या खरेदी-विक्रीमुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला.
"सृष्टीच चक्र यज्ञातून निर्माण झाले आहे. शुद्ध वैदिक पद्धतीने यज्ञ-याग कर्म पूर्ण झाल्यास निश्चित त्याची फलप्राप्ती अशी हमी ऋषिमुनींनी घेतली आहे. मात्र हे सर्व करताना यज्ञासाठी सांगितलेले नियम, लागणारी सामग्री शास्त्रशुद्ध असायला हवी. हल्ली बाजारात अनेकदा यजमानांना योग्य सामग्री मिळत नाही. त्यामुळे दुकानदारांनी जाणकारांच्या मार्गदर्शनाने यज्ञाची सामग्री विक्री करायला हवे."- स्मार्त चुडामणी पं. शांताराम भानोसे.
"यज्ञ- यागादी कर्मातून जीवनात नवचैतन्य प्राप्त होते याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे, त्यामुळे प्रत्येकजण यथाशक्ती भक्तिभावाने यज्ञादी कर्म करत आहेत. विशेषतः दुःख, रोग, दारिद्र्यात तसेच मनोवांचित फलप्राप्तीसाठी यजमान यज्ञ करतात. यात गायीचे शुद्ध तूप, नवग्रहप्रत्यर्थ रुई, पिंपळ, आघर्डा, शमी, वड, खैर आदी समिधा तसेच विविध वनस्पतींची यज्ञात आहुती दिल्याने यज्ञ कर्म सार्थ होते अन् याचे फळ म्हणजे मनुष्य जीवन समृद्ध होते."
- वेदाचार्य रवींद्र पैठणे
"देशभरातून येणाऱ्या भाविक नाशिकमधून यज्ञ सामग्री खरेदी घेऊन जातात. वर्षभर भाविकांचा प्रतिसाद मिळतो. सण- उत्सव काळात प्रचंड प्रतिसाद असतो. दिवसेंदिवस बाजारपेठेची उलाढाल वाढती आहे. नाशिकची ओळख धार्मिकनगरी असल्याने यामुळे भाविक येथेच खरेदीला प्राधान्य देतात."- चंद्रकांत निकम, जय जनार्दन पूजा भांडार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.