Guardian Minister Dada Bhuse speaking at the District Planning Committee meeting. District Collector Jalaj Sharma, MLA Seema Hire etc. esakal
नाशिक

Crop Insurance : पीकविम्याचे 853 कोटी मिळणार : पालकमंत्री दादा भुसे

सकाळ वृत्तसेवा

Crop Insurance : एक रुपयात पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाच लाख ८६ हजार शेतकऱ्यांना ८५३ कोटी रुपयांची भरपाई मिळणे अपेक्षित आहे. येत्या पंधरा दिवसांत इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांना ही मदत मिळेल, अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री भुसे पत्रकारांशी बोलत होते. (Dada Bhuse statement of 853 crore will be received from crop insurance )

यंदाच्या वर्षी नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी जोर धरत असताना पंतप्रधान पीकविमा योजनेतील खरिपातील पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पीककापणी प्रयोगानंतर टक्केवारी पुढे आली होती. यात सोयाबीन, मका, मूग, भात, उडीद, भुईमूग, बाजरी, कापूस, ज्वारी या पिकांच्या उत्पादनात सात वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक घट आली असल्याचा अहवाल थेट केंद्र सरकारच्या पथकानेच दिला होता.

कृषी आणि पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींनीही त्याची पाहणी केली होती. यात जिल्ह्यातील ५५ महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवसांपासून पाऊस झालेला नव्हता. त्यामुळे सर्वाधिक नुकसान नांदगाव तालुक्यात झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले होते. त्यापाठोपाठ मालेगाव, चांदवड, येवला, बागलाण, सिन्नर आदी तालुक्यांचाही त्यात समावेश होता. (latest marathi news)

सप्टेंबरपासून प्रतीक्षा

नाशिक तालुक्यातील मखमलाबाद आणि सातपूर मंडळात उडीदचे, रायपूर (ता. चांदवड) मंडळातील सोयाबीन व बाजरी, तर दुगाव मंडळातील मका, उमराणे (ता. देवळा) मंडलातील मूग पिकाच्या उत्पादनातील घट १०० टक्के होती. करंजगव्हाण (ता. मालेगाव) मंडलातील बाजरीच्या उत्पादनात १२३.२१ टक्के घट झाली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संबंधित वीमा कंपनीच्या

प्रतिनिधींची १ सप्टेंबर २०२३ च्या बैठकीत महिनाभरात पीकविमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात विमा नुकसानभरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम जमा करावी, असे आदेश ओरिएंटल इन्श्‍युरन्स कंपनीला दिले होते. त्यानंतर कंपनीने ७९ कोटी रुपये दिले. पण पीककापणी प्रयोगानंतर पात्र ठरलेल्या पाच लाख ८६ हजार शेतकऱ्यांना जवळपास ८५३ कोटी रुपये अद्याप कंपनीने दिलेले नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर Sachin Tendulkar ची लक्ष्यवेधी पोस्ट

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

रहस्यामुळे खिळवून ठेवणारा थरारपट

Fastest double century : पाकिस्तानच्या Usman Khan ने झळकावले वेगवान द्विशतक, नावावर केला मोठा विक्रम

Pune Sexual Assault Case: पुणे पुन्हा हादरले! घरात घुसून नराधमाने केला महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT