Gurumauli Annasaheb More  esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : ‘वैष्णव जन तो तेने कहिए जे, पीड पराई जाने रे।’ : गुरुमाउली आण्णासाहेब मोर

Nashik News : राष्ट्रपिता महात्मा गांधी हे संत नरसी मेहतांचे भजन नित्य प्रार्थनेत म्हणत असत. ते लोकप्रिय भजन आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राष्ट्रपिता महात्मा गांधी हे संत नरसी मेहतांचे भजन नित्य प्रार्थनेत म्हणत असत. ते लोकप्रिय भजन आहे. ‘वैष्णव जन तो तेने कहिए जे, पीड पराई जाने रे।’ या भजनातून संत नरसी मेहतांनी वैष्णव व्यक्तित्त्वाचेच गुण विशद केले आहेत, असे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी प्रधान केंद्रात रविवारी (ता. १६) सांगितले. (Gurumauli Annasaheb More)

दिंडोरी प्रणित प्रधान अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात रविवारी गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांशी संवाद साधला. गुरुमाउली म्हणाले, की दुसऱ्याचे दु:ख जाणून त्याबद्दल कळवळा असणारा, त्याला मदत करणारा, उपकार करताना किंचितही अभिमान न बाळगणारा, कोणाची कधीही निंदा न करणारा, सर्व लोकांमध्ये सन्मान प्राप्त असून, सर्वांना आदर देणारा, वचन, मन, कर्माने दृढ, कपटरहित.

समानता बाळगणारा, परस्त्रीस मातेसमान मानणारा, सत्यप्रिय, सत्यवचनी, परधनाची किंचितही इच्छा नसलेला, मोह-मायादी विकारांच्या प्रभावाने मुक्त, दृढ वैराग्य धारण केलेला, रामनामात रंगलेला, त्याच्या शरीरात सर्वतीर्थ सामावली आहेत असा पावन, अशा गुणधर्माचा ‘वैष्णव’ नरसी मेहतांनी वर्णिला आहे. अशा व्यक्तिमत्त्वाचे दर्शनही तारणारे असते.

त्यांची संगती उच्च परिवर्तन घडविते, असे सांगून नरसी मेहतांनी एका उच्च, चारित्र्यसंपन्न, उदात्त व्यक्तिमत्त्वाचा आदर्श समाजासमोर उभा केला आहे. असा ‘माणूस’ महात्मा गांधींची महत्त्वाकांक्षा होती. त्यांनी दिलेली एकादश तत्त्वे, या गुणधर्माची वेगळी नावे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शुद्ध नैतिक, चारित्र्यसंपन्न सत्तेवर आधारित लोकशाही म्हणजेच जनतेची स्थापित सार्वभौम सत्ता, हेच ईश्वरीय राज्य किंवा रामराज्य होय.

हे रामराज्य वर्गरहित, स्वातंत्र्य, समानता, न्याय, बंधुत्वाचे एकत्रित स्वरूप, श्रमप्रतिष्ठेने, त्यागाने, साधेपणाने विकसित झालेले राज्य आहे. आदर्श समाजाचे ते साकार स्वरूप आहे. त्याला महात्मा गांधींनी ‘पंचायत राज्य’ही म्हटले आहे. सत्य, अहिंसा, शील यावर आधारित पंचायती राज्यात कुणीही गरीब नसेल, कुणी धनाढ्य नसेल. (latest marathi news)

सर्व खेडी सुखी, समृद्ध व स्वयंपूर्ण असतील, तेथे लालसा, लालच नसेल तर सेवा व औदार्य असेल, अशा आदर्श समाज निर्मितीचा ध्यास महात्मा गांधींनी घेतला होता. हाच ध्यास संतांनी तळमळीने व्यक्त केला आहे. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानात मागितलेला प्रसाद हाच आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्वैयक्तिक स्तरावर उमललेले हे सुंदर, आश्वासक, प्रेरक असे भविष्य-स्वप्न आहे.

अशा आदर्श समाजनिर्मितीची आकांक्षा लोकमनाच्या उत्कृष्ट भावनांचे, त्यात प्रतिबिंबित झालेल्या भारतीय सत्त्वाचे अभिव्यक्त स्वरूप आहे. विकासाच्या गतिमान प्रक्रियेत या आकांक्षेला सामावून घेता येईल. विराट लोकसंख्येच्या देशातील मनुष्यबळाचा कल्याणकारी उपयोग करून घेता येईल. ‘माणूसपण’ अधिक शक्तिवान बनवून प्रगतीची क्षितिजे गाठण्याचा प्रयत्न होईल, तेव्हा खऱ्‍या अर्थाने आम्ही प्रगत, पुरोगामी, विकसित आहोत, असे म्हणता येईल.

अवघा ‘माणूस’ एक होऊन सर्वकल्याणाच्या दिशेने आपापल्या परीने सहभाग देत जेव्हा आयुष्याची सार्थक वाटचाल अनुभवेल. तेव्हा ‘सुजला-सुफला’ वास्तवात येईल. प्रत्येकाची राष्ट्रोत्कर्षात भागीदारी ध्येयनिष्ठ बननिण्यासाठी आता महात्मा गांधींनी दर्शविलेल्या आध्यात्म्याची गरज या देशाला आहे, असेही गुरुमाउली आण्णासाहेब मोरे म्हणाले.

सुरवातीला सकाळी गुरुमाउलींच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची महापूजा झाली. त्यानंतर गुरुमाउलींनी सेवेकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम झाला. स्वामी सेवेनंतर दुपारी गुरुमाउलींनी उपस्थित सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले. सायंकाळी महाआरती झाली. या वेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी आबासाहेब मोरे व सेवेकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 1st Test: नाद खुळा... जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली भारताने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत सिंबा देतोय कॅन्सरशी झुंज ; मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांच्याही डोळ्यात आलं पाणी

Kolhapur: पक्ष बदलूनही अपयश आलेल्या नेत्यांची वाटचाल कशी राहणार? वेगळा विचार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही!

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT