Gurumauli Annasaheb More esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : माणूसपणाच्या संस्कारासाठी सद्गुरूंची गरज : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

Nashik News : माणूसपणाचे संस्कार जागृत ठेवण्यासाठी एकविसाव्या शतकातही समाजाला सद्गुरूंची, संतांच्या प्रबोधनाची गरज आहे, असे प्रतिपादन गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी दरबारात सेवेकऱ्यांशी हितगुज साधताना केले.

सकाळ वृत्तसेवा

दिंडोरी : भारतात वृद्धाश्रम असणे आणि त्यांची संख्या वाढणे हे अत्यंत लांच्छनास्पद आहे. पशू-पक्ष्यांवर प्रेम करणारा भारतीय माणूस एवढा निर्दयी, स्वार्थी होऊ शकत नाही, याचे भान सर्वकाळ असण्यासाठी, माणूसपणाचे संस्कार जागृत ठेवण्यासाठी एकविसाव्या शतकातही समाजाला सद्गुरूंची, संतांच्या प्रबोधनाची गरज आहे, असे प्रतिपादन गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी दरबारात सेवेकऱ्यांशी हितगुज साधताना केले. (Gurumauli Annasaheb More Need of Sadhguru for Cultivation of Humanity)

सद्गुरूंची मानवी जीवनात किती महत्त्वपूर्ण भूमिका आहे, हे विशद करताना गुरुमाउली म्हणाले, ‘‘विज्ञानाबरोबर आत्मज्ञानही प्रवाहित होत राहणे, ही माणसांची गरज आहे. मानवजीवन सरितेचे हे दोन किनारे आहेत. सद्गुरू जीवन व कर्मावरची श्रद्धा वाढवतात, बळकट करतात, परंपरा व इतिहास, संस्कृती व समाजजीवनविषयक आस्था निर्दोष बनवतात, ते जीवनरहाटी मूल्यवान करतात.

ते नराचा नारायण होण्यावरचा विश्वास प्रमाणित करतात. पिढ्यान् पिढ्या टिकून राहणारे चिरंतन आदर्श घडवतात, चिरंतन विचार-संपदा देऊन राष्ट्रे श्रीमंत करतात. अशा सद्गुरूंचे आश्रयस्थान, सद्गुरूंचे सद्गुरू, गुरुतत्त्व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. तेच श्री दत्तात्रेयाचे पूर्ण तेजोमय परब्रह्म स्वरूप आहेत.’’

श्री स्वामी सर्वांच्या हृदयात

श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा ऋषीला कृषीकडे वळवणारी व कृषीला ऋषीपण देणारी अद्भुत सेवा आहे. श्री स्वामींची सेवा विज्ञानाचा प्रत्यय देणारी, ज्ञानी बनवणारी आहे. ईश्वरप्रेम व ईश्वरसेवा विरहित मनोभाव, विचार माणसाला अहंकारी, एकांगी बनवतात, असा माणूस स्वत:ला सर्वश्रेष्ठ मानून ईश्वराचा तिरस्कार जेव्हा करतो, तेव्हा त्यातून हजारो दुर्योधन किंवा दैत्य निर्माण होऊन जनतेचे जगणे असह्य, आतंकित करतात.

हे थांबविण्यासाठी ‘श्री स्वामी सेवा’ समाजात रुजणे, वाढणे आवश्यक आहे. ती सर्व धर्मीयांना, पथांना, सर्व मानवांना सहज प्रेमाने आपलेसे करणारी, मानवतेच्या सूत्रांनी बांधणारी परमभावभक्ती आहे. श्री स्वामी महाराज सर्वांच्या हृदयात विराजमान आहेत. त्यांना अनुभवण्यासाठी दिंडोरी दरबाराची सेवाप्रणाली आहे, असे गुरुमाउली यांनी सांगितले. (latest marathi news)

आध्यात्मिकतेचा उलगडा

श्री स्वामी समर्थ महाराजांना नित्य अनुभवणाऱ्यांच्या हृदयातून देववाणी अभिव्यक्त होते, तेथून मंत्रांचा स्वयंउत्कर्ष होतो, म्हणून आवश्यकता आहे, ती भगवंतांच्या चरणांशी समर्पित होणाऱ्या मनोवृत्तीची. ही मनोवृत्ती घडविण्यासाठी श्रीदत्त जयंतीचा उत्सव व अखंड नामजप सप्ताहाची योजना केली गेली आहे.

भगवान श्री स्वामी मार्गाच्या सेवेचे ध्येय माणूस घडवणे व बिघडलेली मने दुरुस्त करून निर्मळ मानवता सर्वत्र प्रसारित करणे हेच आहे. मानवाने स्वयंप्रेरणेने घडवलेली स्वत:ची लख्ख नैतिक, आंतरिक मनोरचना, प्रवृत्ती म्हणजे आध्यात्मिकता होय’ असे सांगून अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या एकूणच आध्यात्मिक कार्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

सेवामार्गाला गुरुत्वाचे अधिष्ठान

ते म्हणाले, ‘‘ही आध्यात्मिकता देण्याचे, वाढवण्याचे कार्य दिंडोरी मार्ग करत आहे. आज माणसांची आंतरिक व्यवस्था व नैतिकता जेवढी वाढेल, तेवढी बाह्य व्यवस्थांची, बाह्य आयोजनांची गरज संपेल, त्यातून राष्ट्राला उत्तम सामाजिक, आर्थिक नियोजन करायला उसंत मिळेल, अशी सकारात्मक विचारसरणी सार्वत्रिक बनवण्यासाठी भक्ती, सेवेची, उत्तम विवेक घडविणाऱ्या अध्यात्माची नितांत गरज आहे.

ती गरज भागवण्यासाठी अखंड नामजप सप्ताहाचे आध्यात्मिक जागरण या मार्गातून केले जाते. दिंडोरीप्रणीत मार्ग मनोविकासासाठी ज्ञानाचे जागरण, ज्ञानातून विवेकाची बांधणी करणारा, अवघा जन ‘शहाणा’ बनवून आपुलकीने परस्परांना जोडणारा सेवामार्ग आहे. त्याला भगवंत श्री स्वामी समर्थ महाराजांचे तेजोपूर्ण गुरुतत्त्वाचे अधिष्ठान आहे.’’ नेहमीप्रमाणे आजही देशभरातून आलेल्या महिला, पुरुष सेवेकरी, भाविकांनी प्रश्नोत्तरांसाठी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT