Maharshi Ved Vyas & Annasaheb More  esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : श्री व्यासांच्या तत्त्वज्ञानाचा उगम व केंद्रबिंदू ‘मनुष्य’ व ‘मनुष्यता’ : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

Nashik News : तत्त्वज्ञानाचा सर्व पसारा गुरू-शिष्य संवादातून साकार प्रकटला आहे, असे दिंडोरीप्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी शनिवारी (ता. २०) सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

त्र्यंबकेश्‍वर : गुरुपौर्णिमेचा रविवारी (ता. २१) प्रकाशित मंगल, पावन दिन आहे. सर्व वेद, उपनिषदे, पुराणांचा रचनाकार व महाभारतासारख्या अजरामर राष्ट्रीय ग्रंथाचे सर्जक महर्षी व्यासांचा हा स्मृती दिन आहे. दिव्यर्षी व्यास भारतीय ज्ञानगंगेचे उगमस्थान आहेत. व्यास भगवान श्री विष्णूचे अवतार मानले जातात. श्री व्यासांच्या तत्त्वज्ञानाचा उगम व केंद्रबिंदू ‘मनुष्य’ व ‘मनुष्यता’ आहे.

अशा दिव्य प्रतिभा शिल्पी व्यास ऋषींच्या स्मरणाचा पूजनाचा हा दिवस गुरुपौर्णिमेचा, ज्ञानात्मक चेतनेचा दिवस आहे. फक्त भारतातच हा उत्सव साजरा होतो. आध्यात्मिक भारतात गुरू-शिष्य नात्याला फार मोठे महानतेचे परिमाण व उंची लाभली आहे. कारण तत्त्वज्ञानाचा सर्व पसारा गुरू-शिष्य संवादातून साकार प्रकटला आहे, असे दिंडोरीप्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी शनिवारी (ता. २०) सांगितले. (Gurumauli Annasaheb More statement on Sri Vyasa Philosophy Humanity)

श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी साप्ताहिक सत्संग झाला. या वेळी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. गुरुमाउली म्हणाले, या संवादाचे सर्वोत्तम स्वरूप ‘श्रीमद् भगवद्‍गीता’ आहे. गुरू-शिष्याच्या नात्यातून अमूर्त ज्ञान शब्द प्रवाही बनते व निर्गुण ईश्वर सगुण साकारतो.

या गुरू-शिष्याचा चिन्मय आदर्श भगवान शिव व जगदंबा पार्वती आहे. भगवान दत्तात्रेय व त्यांचे अवतार चराचराचे, संपूर्ण ब्रह्मांडाचे श्री गुरू आहेत. ते सद्‍गुरू व गुरुतत्त्व आहेत. अज्ञानाचे निरसन होऊन मानवाला ज्ञानप्राप्तीची ओढ लागावी, ते ज्ञान प्रत्यक्ष अनुभवता यावे, त्या ज्ञानाने ‘मी’पणा व विकार नष्ट होऊन विशालता लाभावी, अंतर्बाह्य तेजोमयता धारण करावी, यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर सद्‍गुरू बनतो.

सद्‍गुरूच्या वात्सल्यपूर्ण बोधाने, कृपेने, मार्गदर्शनाने नराचा नारायण होतो. ‘तुका अणुरेणुहूनी तोकडा। तुका आकाशा एवढा।’, अशी व्याप्ती अनुभवलेल्या सर्व संतांनी अगदी मनोभावे, उचंबळलेल्या भावावेगाने, अनावरण स्फूर्तीने ‘सद्‍गुरू महिमा’ वर्णन केला आहे. सद्‍गुरू सर्व प्रकारच्या ज्ञानाचा दाता आहे.

भरभरून देणारा सद्‍गुरू परम उदार व निष्कांचन, निरपेक्ष आहे. सद्‍गुरूला शरण जाताच जन्म-मरणाचे पाश तुटतात, अशी ग्वाही सर्व संतांनी स्वानुभूतीने दिली आहे. हंसाला मोत्याची आस, कमळाला विकसित होण्यासाठी सूर्योदयाची आस, चातकाला स्वाती नक्षत्राच्या थेंबांची आस, हिरव्या पात्याला सूर्यकिरणांच्या प्राशनाची आस, समुद्राच्या भरतीला पूर्ण चंद्रबिंबाची आस जन्मत: जडावी, तसा गुरूचा ध्यास मनी जडावा, म्हणजे सद्‍गुरू शिष्याला सर्व सामर्थ्यांनी युक्त असे तेजस्वी, ज्ञानी बनवतात. (latest marathi news)

या अर्थाने आपले शिष्यत्व विवेकाच्या आत्म प्रकाशात पारखून घेण्याचा सुदिन म्हणजे गुरुपौर्णिमा होय. ‘तुझे आहे तुजपाशी । परी तू जागा चुकलासी ॥’ अशा चुकलेल्या माणसांना सुधारण्याचे, मूळ स्वरूपात आणण्याचे अलौकिक कार्य लौकिक जगात राहून सद्‍गुरू करतात. अनंतकोटी ब्रह्मांडाचे नायक यतिवर्य श्री स्वामी समर्थ महाराज गुरुतत्त्वाचे पूर्ण तेजोमान निखळ, विशुद्ध ज्ञानस्वरूप होय.

ते ब्रह्मानंदाचे उगमस्थान व सर्व सुखशांतीचे आश्रयस्थान आहेत. गुरुपौर्णिमेला श्री स्वामी महाराजांना आपले गुरूपद घेण्याची सविनय व मनोभावे प्रार्थना करावी. श्री स्वामी महाराज अनंत व सर्वसाक्षी आहेत. ते भक्तवत्सल, भक्ताभिमानी आहेत. त्यांना केलेली प्रार्थना आपल्याला आत्मबळ व प्रचिती देते.

त्यांच्या भक्तीचा परिस स्पर्श लाभून हे दुःखी जीवन आनंदाचे निधान व्हावे, यासाठी सर्व संशय, भ्रम, अहंकार बाजूला ठेवून एक क्षणभर तरी भगवंताच्या चरणी मन समर्पित करावे, यासाठी हा गुरुपौर्णिमेचा उत्सव नवा संदेश, नवी संधी घेऊन चातुर्मासाचा प्रारंभ करताना मनाला उच्चभावनेने सुसंस्कारित करतो आहे. शेवटी एकच ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या।’ या गुरुपौर्णिमेच्या सर्वांना अनंत शुभेच्छा! गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी उपस्थित सेवेकऱ्याना दिल्या.

सुरवातीला गुरुमाउलींच्या आगमनानंतर सेवेकऱ्यांनी जयघोष केला. राज्यभरातून आलेल्या काही सेवेकऱ्यांचे गुरुमाउलींच्या हस्ते प्रसाद देऊन स्वागत करण्यात आले. मार्गदर्शनानंतर शंका निरसन करण्यात आले. महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT