Gurumauli Annasaheb More esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : जनतेने एकत्रित होऊन संकल्पाने नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

Nashik News : गुरुमाउली म्हणाले, की लोकशक्ती व विराट मनुष्यबळ अशा पद्धतीने सामाजिक एकोप्याने, सामाजिक बांधिलकीने, सामाजिक व राष्ट्रीय कल्याणासाठी उपयोगात आणणे, ही भारतीय जगण्याची जुनी रहाटी आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गावात किंवा शहरात काहींच्या मनात विचार उमटतो, तुटलेली, भंगलेली देवालये पुन्हा बांधावी किंवा या रिकाम्या जागेत एखादे सुबक, छोटेसे मंदिर बांधावे, सभोवताली नीट बाग राखावी, संस्कारांचे पवित्र वातावरण त्यातून अनायास तयार होईल, मग बैठका होतात. बहुमताने होकार येतो, माणसे कामाला लागतात, विभागणी होऊन जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात. (Gurumauli Annasaheb More)

सगळीकडे कार्य पूर्ण होईपर्यंत उत्साह असतो. यातल्या काही उणिवा व खर्चाची उधळपट्टी सोडून देऊन महत्त्वाची बाब आहे. ‘जनतेने एकत्रित होऊन, संकल्पाने नवनिर्मितीचा ध्यास घेणे’. हा ध्यास वेगवेगळ्या जनहितकारी विधायक कार्यासाठी, उभारणीसाठी नित्य व सर्वत्र असणे फार गरजेचे आहे, असे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी प्रधान केंद्रात रविवारी (ता. १४) सांगितले.

दिंडोरीप्रणीत प्रधान अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात रविवारी गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांशी संवाद साधला. गुरुमाउली म्हणाले, की लोकशक्ती व विराट मनुष्यबळ अशा पद्धतीने सामाजिक एकोप्याने, सामाजिक बांधिलकीने, सामाजिक व राष्ट्रीय कल्याणासाठी उपयोगात आणणे, ही भारतीय जगण्याची जुनी रहाटी आहे.

भारतीय संस्कृती, मूल्ये, नैतिकता व समाजजीवन ‘सर्वमंगल-मांगल्ये’अशा विशाल विचारसरणीवर आधारलेली आहे. अंतर्बाह्य ईश्वरमय झालेल्या निष्काम संत, योग्यांनी, ऋषींनी, सिद्धींनी लोकसंग्रहासाठी आयुष्य व्यतीत केले. ‘संत जैसे दीपिका । उजळती विवेक प्रकाशा ।’ अशा तळमळीने आयुष्याच्या अमरत्वाची देखणी परंपरा, भारतीय इतिहासाचे परम ऐश्वर्य आहे.

भगवान बुद्धाने बोधिसत्त्व ज्ञान प्राप्त केल्यानंतर प्रत्येक गावी जाऊन जनतेला सद्धर्माचा, सत्कर्माचा, दु:ख निवृत्तीचा परम उपदेश केला. भगवान श्री स्वामी महाराजांनी तर भोळ्या-भाबड्या, चुकलेल्या-भांबावलेल्या जनतेला बोट धरून ज्ञानाच्या वाटेवर चालवले. प्रसंगी कठोर होऊन उन्मत्तांना वठणीवर आणले, तसेच ढोंगांचा बुरखा फाडला, राजा-रंक दोघांना सारखेच मार्गदर्शन केले व जनांस आत्मविश्वासाने राष्ट्रहितासाठी कामाला लावले. (latest marathi news)

जाती- धर्म- भाषा- प्रांत आदी भेदभावांच्या भिंती पाडून मानवतेचे कडेकोट बांधले. जनतेचा विवेक जागृत करून पतितांना सुधारण्याची संधी दिली. स्वामी चरित्र सारामृतात स्वामींच्या वैश्विक कल्याणाच्या कार्यांचे दाखले विविध लीला-प्रसंगातून अनुभवता येतात. प्रत्येक माणूस या विशाल, दिव्य परंपरेचा पाईक आहे. मग स्वार्थापुरते जगण्याचा यातना-मार्ग आम्ही का निवडला? का आम्ही दीन- हीन- गरीब- लाचार बनावे?

जनतेने जनहिताच्या तळमळीने कल्याणकारी संस्था, भवने तयार करावीत. जर अशा कार्यांना भगवंताचे अधिष्ठान असेल, तर त्यात कलह, हेवे-दावे, धोखेबाजी, सत्तालोलुपता येणार नाही. यातून भारत महासत्ता बनेल. स्वप्ने वास्तवात आणण्यासाठी कठोर मेहनत, दूरदर्शी नियोजन व विशाल उद्दिष्टे असावी लागतात. ती जनतेला स्वतः आदर्श बनून इतरांना शिकवावी लागतील. त्यासाठी प्रत्येकाने लोकहितकारी विचार बाळगणे आवश्यक आहे.

संतांनी ‘याचि देही, याचि डोळा’ परमेश्वराशी ऐक्य साधले तरी क्षणाची विश्रांती घेतली नाही. काळानुसार त्यांनी लोकोद्धाराचे, लोकहिताचे कार्य अखंडपणे, शेवटच्या श्वासापर्यंत केले. या देशात अफाट लोकसंख्या असली तरी कोणीही उपाशी राहणार नाही, असे या भारतभूमीने भरभरून दिले आहे, देते आहे. राबणारे असंख्य हात अशक्य ते शक्य करू शकतात. त्यासाठी ‘आनंदवन’ निर्माण करणाऱ्या आदरणीय बाबा आमटेंचे करुण हृदय असावे लागते.

अशा करुणेचा प्रस्फुटित होण्यासाठी उत्तम सामाजिक पर्यावरण व संस्कारांचे सशक्त बाळकडू लागते. ते देण्यासाठी श्रमांचे अध्यात्म प्रत्येक माणसाच्या मनात रुजले पाहिजे. चाकोरीबद्ध काम यांत्रिकतेने, सरावाने करणे, बौद्धिक-श्रमांची वास्तववादी विभागणी व कार्यवाही न होणे, शारीरिक श्रमांविषयी अरुची व हीन दृष्टिकोन, श्रमांच्या ऐवजी ढोंग, देखावा, टाळाटाळ यांच्याद्वारा कामे तुंबून ठेवणे, योग्य श्रमांची कदर नसणे.

बौद्धिक श्रम व शारीरिक श्रम यांचे सामंजस्य नसणे, अशा अनेकविध कारणांमुळे श्रम, विकास व मोबदला यांचे गुणोत्तर व्यस्त राहाते, मेळ जमत नाही. आज सर्वांना सुविधा हव्यात; पण त्यासाठी कष्ट नकोत. रस्ते, पाणी, ऊर्जा, शिक्षण, रोजगार व जीवनावश्यक गोष्टींची पूर्तता यासाठी स्वावलंबी होणे आवश्यक आहे. स्वावलंबी समाजासाठी श्रमांचे अध्यात्म जाणून घेऊन अमलात आणणे आवश्यक आहे.

रूढ श्रम विचारांत आमूलाग्र बदल ही आजची मोठी गरज आहे, असे गुरुमाउली आण्णासाहेब मोरे म्हणाले. सुरवातीला सकाळी गुरुमाउलींच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची महापूजा झाली. त्यानंतर गुरुमाउलींनी सेवेकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम झाला. स्वामी सेवेनंतर दुपारी गुरुमाउलींनी उपस्थित सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले. सायंकाळी महाआरती झाली. या वेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी आबासाहेब मोरे व सेवेकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT