Gurumauli Annasaheb More  esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : भगवंताच्या मागणीतच त्याच्या प्राप्तीचा मार्ग! गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

Gurumauli Annasaheb More : संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांसारख्या महान संतांचे नाव आजही टिकून आहे.

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांसारख्या महान संतांचे नाव आजही टिकून आहे. याचे कारण, त्यांचे नामस्मरणावरील प्रेम. संतांच्या वचनांवर आपण विश्वास ठेवतो. त्यांच्याप्रमाणे आपणही नामस्मरण करावे, असे आपल्याला वाटते; पण तसे होत नाही. (nashik Gurumauli Annasaheb More marathi news)

भगवंताच्या नामाला उपमा देताना, त्या अमृताच्या पलीकडे दुसरी गोष्टच नाही, असे आपण म्हणतो. मग आपण अखंड नामस्मरण का करू शकत नाही? नामस्मरणाच्या आड काहीतरी येत असावे, हे निश्चित.

ज्याप्रमाणे तोंडात साखर टाकल्यावर जर ती गोड लागली नाही, तर तो दोष साखरेचा नसून, आमच्याच तोंडाला चव नाही, असे आपण म्हणतो, त्याप्रमाणेच नामस्मरणाची गोडी आमच्या अनुभवास येत नसेल, तर आमच्यातच काही तरी दोष असला पाहिजे, असे गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी शनिवारी (ता. २४) सांगितले.

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरुपीठात साप्ताहिक हितगूज झाले. या वेळी ते बोलत होते. गुरुमाउली आण्णासाहेब मोरे म्हणाले, की अखंड नामस्मरण न होण्याचे कारण प्रत्येक जण काहीतरी सांगतो. लग्न झाले नाही, पैसा नाही, प्रपंचाचा व्याप, प्रापंचिक दु:खे अशी कारणे सांगितली जातात.

सर्व जण ज्या परिस्थितीत असतात, त्या परिस्थितीत अखंड नामस्मरणाला अडचणी सांगत असतात; परंतु अखंड श्री स्वामींचे नामस्मरण न व्हायचे खरे कारण आहे, भगवंत पाहिजे असे आम्हांला मनापासून वाटतच नाही. भगवंत पाहिजे आहे असे वाटणे, हे खरोखर भाग्याचे लक्षण आहे.

खरोखरच ‘भगवंत पाहिजे’ असे वाटू लागले म्हणजे त्या मागणीतच ‘श्री स्वामी समर्थ’ महाराजांच्या प्राप्तीचा मार्ग दिसू लागेल. गुरुमाउलींनी स्वत: राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. या वेळी चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे उपस्थित होते. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ही' नक्कल केल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा विजय झाला; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमारांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोट्यावधी रुपयांचं चरस जप्त

MLA Hemant Rasne : कसबा विधानसभा नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने कचरा, कोंडीमुक्त मतदारसंघासाठी प्रयत्न

Islampur Results : जयंतराव-निशिकांत पाटलांमध्ये गावागावांत टक्कर; अनेक गावांत जयंतरावांना धक्‍का, कोणाला किती पडली मतं?

Crime News: स्मशानातील लाकडांवर रक्ताचे डाग; दोघांनी मिळून केला होता खून, पोलिसांनी 'असा' लावला छडा

SCROLL FOR NEXT