Farmer spreading weeds in Kharif season field. esakal
नाशिक

Nashik News : जेमतेम पावसाच्या भरवशावर पेरण्या; दक्षिण पट्ट्यात शेतकऱ्यांनी घेतली रिस्क

Nashik News : येसगाव परिसरात जेमतेम पाऊस झाला. खरीप हंगामाला उशीर होत असल्याने शेतकऱ्यांनी रिस्क घेत रिमझिम पावसाच्या भरवशावर पेरण्या करण्यास सुरवात केली आहे.

प्रभाकर बच्छाव : सकाळ वृत्तसेवा

येसगाव : मालेगाव तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. येसगाव परिसरात जेमतेम पाऊस झाला. खरीप हंगामाला उशीर होत असल्याने शेतकऱ्यांनी रिस्क घेत रिमझिम पावसाच्या भरवशावर पेरण्या करण्यास सुरवात केली आहे. चंदनपुरीपासून येसगाव परिसर भागात जेमतेम पावसावर पेरणी सुरू आहे. (Nashik News)

रोहिणीचा सुरुवातीला थोडा पाऊस आला. नंतर मृग नक्षत्रात साधारण पाऊस पडला‌. त्यामुळे शेतात पेरणी आधीच तणाने डोके वर काढले. तणानेच शेत हिरवे झाले. तणाची वखरणी करून अद्याप शेत तयार केले जात आहे. त्यातच उन्हाचा तडाका वाढला आहे. पारा ३७ अश सेल्सिअस पर्यंत आहे. २१ जूनला सुरू झालेल्या आद्रा नक्षत्राने थोडीफार हजेरी लावली.

ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची सोय आहे, त्यांनी मका व काही ठिकाणी ठिबकवर कपाशी पिकाची लागवड केली आहे. पाऊस पडण्याच्या अपेक्षेवर मका, बाजरी आदी पिके पेरली जात आहेत. दुसरीकडे विहिरींनी तळ गाठला आहे. चार दिवसांपूर्वी पडलेल्या पावसावर शेतात सर्वत्र पेरणीचे काम सुरू आहेत. बळीराजांनी यावर्षी मका पिकास प्राधान्य दिले. शेतकऱ्यांनी अनेक अडचणीतून मार्ग काढण्याची बियाणे, मजुरी, खताची तजवीस करून ठेवली.

मृगाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या थोड्या पावसाने शेतकरी आनंदी झाला होता. या पार्श्‍वभूमीवर बियाणे खरेदी केले होते. ‘गरजेल तो पडेल काय’ या युक्तीप्रमाणेच पावसाने दांडी मारली. पाऊस न पडल्यामुळे काही भागात शेतातील ढेकळे फुटलेली नाहीत. अशा भयानक परिस्थितीत पीक नियोजनात करावा लागणारा बदल त्यातच मका पिकाची लागवड यावर होणारा परिणाम त्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला आहे. (latest marathi news)

सध्या पावसाने उघडीप दिली आहे. शेतात वापसा आल्याने पेरणीपूर्वी तण काढणीची कामे चालू आहे. या आठवड्यात बागायती शेतीत कोळपणीला सुरुवात होणार आहे. बऱ्याच भागात कपाशीचे पीकही चार पानांवर आले आहे. बागायती शेतीमध्ये मुख्य पिकासह तणाची वाढ झाली आहे.

पेरणीची वाफ वाया जाऊ नये म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने मका पेरणी केली. मका कोळपणीनंतर निंदनीचा खर्चही कमी येतो. शेतातील हलक्या जमिनीत शेतकऱ्यांनी मठ, मूंग, उडीद, चवळी, कुलीथासारख्या कडधान्याच्या पेरणीला प्राधान्य दिले आहे. पाच टक्के क्षेत्रात बाजरी ,भुईमूग, तूर, तिळाची पट्टा पेरणी सुरू आहे.

"नदी-नाल्यांना भरभरून पाणी यावे. तलाव भरावेत. विहिरींना पाणी उतरावे. यासाठी जोरदार पावसाची गरज आहे. पाणीटंचाई दूर व्हावी, खरीप हंगाम वाया जाऊ नये यासाठी दमदार पावसाची वाट पाहत आहोत. पावसाची चिन्हे दिसतात. परंतु, पाऊस येत नाही." - आकाश सूर्यवंशी, शेतकरी, येसगाव बुद्रुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT