Nashik NMC esakal
नाशिक

Clean Air Survey : शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली का? सर्वेक्षणातून महापालिकेला विचारला जबाब

Nashik News : शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र शासनाकडून ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम’ अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीची झाडाझडती सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र शासनाकडून ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम’ अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीची झाडाझडती सुरू झाली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या निधीतून स्वच्छ हवेसाठी काय प्रयत्न केले? शहरातील हवेची गुणवत्ता खरोखर सुधारली का? याची लेखी स्वरूपात माहिती वायु सर्वेक्षणातून केंद्राने महापालिकेकडे मागितली आहे. (Clean Air Survey)

केंद्र सरकारने झाडाझडती सुरु केल्यानंतर महापालिकेने हवेच्या गुणवत्तेत बारा टक्के सुधारणा झाल्याचा दावा केला आहे. शहरांचा वाढता विकास लक्षात घेता, हवेची गुणवत्तादेखील राखणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अर्थात नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एन-कॅप) अमलात आणला आहे.

देशातील १३२ शहरांमध्ये २०२४ अखेरपर्यंत प्रदूषणाची पातळी ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या उद्देश या मागे आहे. या योजनेत नाशिक महापालिकेचादेखील समावेश आहे. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारने स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत ८७ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. या अनुदानातून महापालिकेने सौरऊर्जा पॅनल बसविणे, ई-बस, बस डेपो उभारणी, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन निर्मिती, यांत्रिकी झाडू खरेदी.

विद्युत शवदाहिनी, वृक्षारोपण, हवा गुणवत्ता मोजमाप केंद्रे आदी उपक्रम राबविले आहे. त्याचबरोबर शहरातील डेब्रिज वाहून नेण्याबरोबरच त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्पदेखील अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या उपक्रमाचा खरोखरच उपयोग झाला आहे का? हवेची गुणवत्ता सुधारली आहे का? निधीचा योग्य पद्धतीने विनियोग होत आहे का? या संदर्भात सकारात्मक परिणाम तपासण्यासाठी वायू सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. (latest marathi news)

तर ठरणार मानांकन

शहरातील हवेची गुणवत्ता सुधारणे महत्त्वाचे आहे. निधी देवूनही उपाययोजना होत नसतील तर उपयोग नाही. त्यामुळेच वायु सर्वेक्षण केले जात आहे. हवेच्या गुणवत्तेत किती प्रमाणात सुधारणा झाली. याचा अभ्यास करून शहरांचे मानांकन ठरविले जाईल व मानांकनानुसारचं महापालिकेला निधी मिळणार आहे. १५ जूनपर्यंत केंद्र सरकारकडे माहिती द्यावी लागणार आहे. त्यानुसार पर्यावरण, घनकचरा, बांधकाम विभाग, उद्यान, शिक्षण, विद्युत, नगररचना विभागाकडून माहिती भरून घेतली जाणार आहे.

गुणवत्तेत सुधारणा

गुरुगोविंद स्कूल, केटीएचएम महाविद्यालय व पंचवटी विभागातील हिरावाडीतील नाट्यगृहाजवळ तीन ठिकाणी हवा गुणवत्ता नियंत्रण केंद्र उभारले आहेत. त्यावरील माहितीनुसार तीन वर्षात शहराच्या हवा गुणवत्तेत १२ टक्के सुधारणा झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

यामुळे हवा गुणवत्तेत सुधारणा

* शहरात ७९० टन कचरा निर्मिती, १०० टक्के संकलन.

* शंभर टक्के प्लॅस्टिक संकलन.

* ४५ टन ड्रेबिजचे संकलन, प्रकल्पावर प्रक्रिया.

* ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Private Property Rights: खाजगी मालमत्ताधारकांच्या हक्कांना मिळाला मजबूत आधार ; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार? मुंबई इंडियन्सच नव्हे, तर चार तगडे संघ बोली लावणार

Nashik Vidhan Sabha Election: विधानसभेत महायुतीला 175 जागा मिळणार; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषदेत माहिती

Diwali Weekend Hotel Spike : शहर निघाले हॉटेलिंगला..! चार दिवसांत ३ ते ४ कोटींची उलाढाल, सुट्यांमध्ये गाठणार ९ कोटींचा टप्पा

Heena Gavit : भाजपला विधानसभेच्या तोंडावर मोठा झटका! माजी खासदाराचा पक्षाला रामराम; विधानसभेच्या मैदानात अपक्ष लढणार

SCROLL FOR NEXT