वणी : वणी व परीसरात आज दुपारी झालेल्या वाढळीपावसाने झाडाच्या आडोशात बसलेल्या इसमावर झाड कोसळून मृत्यु झाला आहे. तसेच वादळामूळे पिंपळगाव रस्त्यावरील आठ काद्यांचे शेड कोसळून कांदा भिजल्याने लाखोंचे नुकसान तर अनेक विद्युत खाब क्षतीग्रस्त झाल्याने शहरात बत्तीगुल झाली आहे. (Nashik Havoc of unseasonal rain with One died in Vani)
वणी व परीसरात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे शंखेश्वर नगर परीसरातील नांगी नाल्याजवळ वादळीवारा व पावसामुळे किशोर आंबादास भागवत, वय ५५ मावडी, ता. दिंडोरी बाभळीच्या झाडाखाली आडोश्याला पांघरूण बसलले असतांना, वादळी वाऱ्यामुळे बाभळीचे झाड त्यांच्या अंगावर पडले, त्यात ते झाडाखाली दबले गेल्याने जागीच मृत्यु झाला.
त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डाॅ. गायधनी यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत पोलिसांत आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तसेच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वणी - पिंपळगाव रस्त्यावरील ८ कांद्याचे शेड पडून उध्वस्त झाले असून शेडमध्ये असलेला लाखो रुपयांचा कांदा भिजल्याने जवळपास साठ ते सत्तर लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
उडालेले व पडलेले शेड हे काही ट्रॅक्टर व पिकअप वर कोसळल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. काही विद्युत खांब क्षतीग्रस्त झाले असून विद्युतवाहीन्या जागोजागी तुटल्या आहेत. अचानक आलेल्या वादळी पावसाने बाजार पेठेत आलेल्या लोकांची धावपळ झाली. (latest marathi news)
बाजारपेठेत भाजीपाला विक्रेत्यांची तांराबळ होवून दुकानाचे छत उडून गेले. काही ठिकाणी घराचे पत्रेही उडून नुकसान झाले आहे. वणी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होती, त्यामूळे अचानक आलेल्या पावसाने कांदे झाकण्याची धावपळ झाली तर काही प्रमाणात कांदे भिजले.
बाजार पटांगणात लावलेले पाल ही उडाले. यात मोकळे पटांगण असल्याने माल लढविण्यास जागा नसल्याने कांदा थोड्याफार प्रमाणात भिजला. पिंपळगाव रोडवरील परमानंद किशोर रा. वणी यांच्या काद्याची जाळीचे शेड, व कांदा एकुन १५ लाखांचा, वाघेऱ्याच्या डोंगराजवळ असेलेल्या अर्जुन राहाने रा. सुकेणे यांचे दोन शेड कोसळले असुन शेड सह काद्यांचे ४० लाखाचे नुकसान झाले आहे.
त्यांच्याच शेड खाली कांदा विक्री करण्यासाठी आलेले 5 ट्रॅक्टर, एक पिकअप, एक छोटा हत्ती, एक ट्रक यांचे ही मोठे नुकसान झालेले आहे. तसेच मोहसिन मनियार यांचे शेड व कांदा ९० टन कांदा अंदाजे किंमत १५ लाखाचे नुकसान, विजय कुमार ठक्कर शेड उडाला असुन लाखोंचा कांदा भिजला आहे. अशोक बोरा यांच्या शेडचे पत्रे उडाले असुन त्यांचाही लाखोंचा कांदा भिजला आहे. अतुल पाटील ब्रदर्स खेडगाव ३ लाखाचा कांदा भिजला. नंदुशेठ चोपडा यांचे शेडसह कांद्याचे २० लाखांचे नुकसान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.