निफाड : ‘पाणी हेच जीवन’ या बिरुदावलीप्रमाणे अलीकडील आठ ते दहा वर्षांत शुद्ध पाणी वापराकडे कुटुंबांचा कल वाढला आहे. गावागावांतून बारमाही वाहणाऱ्या नद्या हंगामी झाल्या. गावच्या गटारगंगा अशा नद्यांना मिळून पाणी अशुद्ध होऊ लागले. दुसरीकडे विहिरींची पाणीपातळी खालावल्यामुळे कूपनलिकेचे उदंड पीक ग्रामीण भागात फोफावत गेले. स्वाभाविकपणे पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढले. ते जसे मानवाच्या आरोग्यास अपायकारक तसेच पिकांनाही धोकादायक बनले. (Health conscious youth are getting employment through water purification project )
त्यामुळे गावागावांत पाणी शुद्धीकरण प्रकल्पांतून माफक दरात शुद्ध पाण्याचा पुरवठा ग्रामस्थांना होऊ लागला आहे. गंगा गोदावरी, कादवा, विनता, बाणगंगा, पाराशरी, गोईसह नांदूरमध्यमेश्वर, पालखेड, गंगापूर धरणाच्या कालव्याने निफाड तालुक्याच्या बहुतेक भागात पाण्याची चांगली परिस्थिती असली तरी तालुक्यातील वाहणाऱ्या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. निफाड तालुक्याची जीवनवाहिनी असलेली गोदावरी देखील नाशिक शहरातील सांडपाणी आणि औद्योगिक वसाहतीच्या पाण्यामुळे प्रदूषित झाल्याने निफाड तालुक्यातील जीवनमानावर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला.
निफाड शहरासह ग्रामीण भागात आता लोकसहभागातून, सामाजिक संस्था, ग्रामपंचायत, तसेच खासगी स्तरावर शुद्ध पाण्याचे प्रकल्प उभे राहिल्याने आता आर-ओ प्लांट रोजगाराचे साधन बनले आहे. निफाड शहरात आठ शुद्ध पाण्याचे केंद्र असून, निफाडकरांना घरपोच दहा रुपयांत २० लिटर पाणी मिळू लागले आहे. दरम्यान ग्रामीण भागात अनेक ग्रामपंचायतीत ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर पाच रुपयांत वीस लिटर पाणी मिळत आहे. (latest marathi news)
असे असले तरी काही गावात ऐकापेक्षा जास्त आर-ओ प्लांट उभे राहिल्याने आता या व्यवसायात स्पर्धा निर्माण झाली आहे. एकीकडे वाढते जलप्रदूषण आणि त्यातून निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्येमुळे आता नागरिकांचा कल शुद्ध पाण्याकडे असल्यामुळे गावागावांत आर-ओ प्लांट उभे राहिले आहे.
निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर धरण परिसरातील २० किलोमीटरहून अधिक परिसरात धरणाचे बँक वॉटरच्या क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात क्षारपड क्षेत्र आहे. या भागात पाणि प्रदूषित असल्यामुळे डाळीदेखील शिजत नाही. चहा फुटणेसारखे प्रकार घडत असल्यामुळे गोदाकाठच्या गावांत देखील प्रत्येक कुटुंबाचा शुद्ध पाणी वापरण्याकडे कल आहे.
शेतीसाठी ‘आर-ओ’चे पाणी
नाशिक जिल्ह्याची द्राक्ष पंढरी म्हणून निफाड तालुका ओळखला जातो. मात्र आता जल प्रदूषणाचा विपरीत परिणाम द्राक्षशेतीवर देखील होऊ लागला आहे. त्यावर आता निफाडचे द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्ष पिकाच्या फवारणीसाठी, डीपिंगसाठी पाण्याचा पीएच मेंटेन करण्यासाठी ‘आर-ओ’चे पाणी वापरू लागले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीलादेखील आता ‘आर-ओ’ पाण्याचा वापर वाढला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.