doctor esakal
नाशिक

Nashik News : बागलाणची आरोग्य व्यवस्था रामभरोसे! अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे सेवेचा बोजवारा

Nashik News : बरेच वैद्यकीय अधिकारी निवासी न राहता तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शासकीय आरोग्य सेवा रामभरोसे चालली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सटाणा : बागलाण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अपुऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी संख्येमुळे आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. बरेच वैद्यकीय अधिकारी निवासी न राहता तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शासकीय आरोग्य सेवा रामभरोसे चालली आहे. (Health system of Baglan in problem due to inadequate staffing)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने याप्रश्‍नी लक्ष घातले आहे. शासनाने ग्रामीण भागातील नागरीकांचे आरोग्य सुदृढ रहावे, त्यांना मोफत व नियमित आरोग्य सेवासुविधा मिळाव्यात यासाठी ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांची स्थापना केली आहे. पुरेसा औषधसाठा व रूग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सुस्थितीतील बेड, स्वच्छतेसह विविध सुविधा पुरविल्या जातात.

मात्र, या सर्व सोयी-सुविधांसह रुग्णालयच वैद्यकीय अधिकारी आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे सोपवत असल्यामुळे रूग्णांना अपेक्षित उपचार मिळत नाहीत. योग्य तपासण्या व चाचण्या होऊन इलाज होत नसल्यामुळे रुग्णांना नाईलाजास्तव खासगी रूग्णालयांमध्ये जावे लागते.

बागलाण तालुक्यात सटाणा, नामपूर, डांगसौदाणे या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे. तर ब्राह्मणगाव, अंबासन, जायखेडा, ताहाराबाद, विरगाव, निरपूर, कपालेश्‍वर, केळझर, अलियाबाद, साल्हेर, मुल्हेर असे ११ प्राथमिक आरोग्य केंद्र, तर ५२ आरोग्य उपकेंद्रे आहेत.

विरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या एकही वैद्यकीय अधिकारी नाही. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी, तर मुख्य जागा रिक्त आहेत. मुल्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांना दाखल करून घेण्यासाठी कोणत्याही सुविधा नसून शिपाई पदापासून महत्वाच्या पदांवर नियुक्त्या रखडल्या आहेत. (latest marathi news)

मुल्हेर परिसरात पावसाळ्यात विंचू, साप आदी विषारी प्राण्यांसह बिबट्यांचा वावर वाढला असल्याने इजा झालेल्या रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी औषधसाठा उपलब्ध नसल्याने येथील वैद्यकीय अधिकारी हतबल आहेत. या भागात सतत डेंगी, मलेरीया आदी साथींचा प्रादुर्भाव असतो. यावर इलाज करण्यासाठी कोणतीही वैद्यकीय यंत्रणा या ठिकाणी नसल्यामुळे रूग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

अधिकाऱ्यांची गैरहजेरी

आलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत एखाद्या खासगी रुग्णालयाला लाजवेल अशी आहे. मात्र, वैद्यकीय अधिकारी आपल्या नियुक्तीच्या जागेवर न थांबता केवळ सयाजीराव म्हणून काम करीत आहेत. ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकारी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी का थांबत नाहीत, यासाठी तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागाचे फिरते पथक नियुक्त होण्याची गरज आहे, अशी मागणी तालुका उपाध्यक्ष संदीप भामरे, कार्याध्यक्ष भारत खैरणार, वैभव गांगुर्डे, सुयोग अहिरे, यशवंत कात्रे, फईम शेख यांनी केली आहे.

"डांगसौंदाणे ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचे पगार तीन महिन्यांपासून थकले आहेत. एकूणच सलाईनवर असलेल्या आरोग्यवस्थेचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी लवकरच आरोग्य संचालकांची भेट घेऊन कार्यवाहीची मागणी करणार आहे."

- राजेंद्र सोनवणे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT