Nashik News : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा दीक्षान्त समारंभ शुक्रवारी (ता. २३) सकाळी अकराला विद्यापीठ प्रांगणातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीतील धन्वंतरी सभागृहात पार पडणार आहे. या वेळी २६ विद्यार्थ्यांना पीएच. डी. (विद्या वाचस्पती) पदवीने गौरविले जाईल. विविध विद्याशाखांतील १११ गुणवंतांना सुवर्णपदक, प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभास कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस ऑनलाइन अध्यक्षस्थानी असतील. (Nashik Health University convocation ceremony marathi news)
विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, बेळगावचे केएलई अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्चचे कुलगुरू डॉ. नितीन गंगणे यांची उपस्थिती असेल. समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या १२ हजार ४८६ स्नातकांना पदवी प्रदान केली जाईल.
या वेळी आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे ५५१, दंत विद्याशाखा पदवीचे दोन हजार १९५, आयुर्वेद विद्याशाखेचे ८७१, युनानी विद्याशाखेचे ९९, होमिओपॅथी विद्याशाखेचे एक हजार २१७, बेसिक बी.एस्सी. नर्सिंग दोन हजार ४६४, पीबी बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखेचे ३६६, बीपीटीएच विद्याशाखेचे २५४, पॅरामेडिकल विद्याशाखेचे ६३७, पदवी ऑप्टोमेट्री ५२, ॲक्युपेशनल थेरपी पदवीचे १७.
बीपीओ विद्याशाखेचे चार तसेच पदव्युत्तर विद्याशाखेत वैद्यकीय दोन हजार ८६४, दंत ४९७, आयुर्वेद ६३, होमिओपॅथी १८, एमएएसएलपी दोन, पदविका वैद्यकीय विद्याशाखेचे दोन, एमपीओ दोन, नर्सिंग ९२, ॲक्युपेशनल थेरपीचे २९, फिजिओथेरपी १५, डीएमएलटी ८७, डिप्लोमा पॅरामेडिकल विद्याशाखेच्या ८८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल.
कुलपती तथा राज्यपाल यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमच्या ‘ई-प्रबोधिनी’ व बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी पुस्तिकेच्या ब्ल्यू प्रिंटचे प्रकाशन होईल. आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. ख्रिस्टोफर डिसूझा यांना डी. लिट. ही विद्यापीठाची विशेष पदवी प्रदान केली जाईल. समारंभाचे यू-ट्यूबद्वारे प्रक्षेपण होईल.
‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उद्घाटन
आरोग्य क्षेत्रात संशोधन, जागतिक दर्जाचे आरोग्य शिक्षण व आरोग्य सेवांमध्ये सकारात्मक बदल होण्यासाठी विद्यापीठाकडून ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना केली आहे. या सेंटरचे उद्घाटन विद्यापीठाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होईल.
या कार्यक्रमास केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक गोपालका ऑनलाइन उपस्थित राहतील. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. दिनेश वाघमारे, कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांची उपस्थिती असेल. (latest marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.