Nashik News : गुरुवारी (ता. ६) दिवसभर दमट वातावरणामुळे असह्य उकाडा जाणवत असताना सायंकाळी पाचनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि पावसाच्या टपोऱ्या थेंबामुळे अवघ्या काही मिनिटांतच नागरिकांना या उकाड्यापासून दिलासा मिळाला. येत्या दोन दिवसांत मॉन्सूनचे महाराष्ट्रात आगमन होणार आहे. (Heavy presence of pre monsoon rains)
त्याआधीच मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. दुष्काळाने होरपळत असलेल्या लोकांना या पावसाने दिलासा मिळाला. नांदगाव, येवला, चांदवड या तालुक्यांमधील काही गावात बुधवारी (ता. ५) रात्री झालेल्या पावसामुळे नाल्यांमध्ये पाणी साचले. नांगरलेल्या शेतातही पाणी साचल्याने विहिरींची पातळी वाढण्याची शक्यता आहे.
मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतीकामांना वेग आला असून, पुढील आठवड्यापासून कापूस, मक्याची लागवड होण्याची शक्यता आहे. गुरुवारी सायंकाळी शहरातील नाशिक रोड, देवळालीगाव, कॅम्प या भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बराच वेळ वीजपुरवठा खंडित राहिला.
नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. सोसाट्याचा वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले. द्राक्ष, टोमॅटोबागांच्या ताराही झुकल्या. त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे समजते. मॉन्सूनपूर्व पावसाच्या आगमनामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी मॉन्सून दोन दिवसांनी सुरू होणार आहे. त्यानंतर खरिपाच्या पेरणीला वेग येईल. (latest marathi news)
सात मिनिटे आधीच कळणार, कुठे वीज पडणार
पावसाळ्यात कधी कोठे वीज कोसळेल, याचा अचूक अंदाज येत नसल्यामुळे अनेकदा निष्पाप बळी गेले आहेत. यावर उपाय म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने ‘दामिनी’ व ‘सचेत’ हे दोन ॲप सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यावर लाल रंग म्हणजे सात मिनिटांत कुठे वीज पडणार, याविषयी माहिती कळते.
पिवळा रंग आपल्याला १४ मिनिटांत कुठे वीज पडणार, याची माहिती देतो. निळा रंग २१ मिनिटे अगोदर वीज पडण्याचे ‘लॉकेशन’ दाखवतो. त्यामुळे या ॲपच्या माध्यमातून संभाव्य नुकसान टाळणे शक्य झाले आहे.
https://play.google.com/store/apps/details0id=com.lightening.live.damini या लिंकवरून ॲप डाउनलोड करू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.