निफाड : निफाड तालुक्यातील दोन दिवसापासून पूर्व भागामध्ये पाऊस बरसत असल्याने काढणीस आलेल्या सोयाबीन उत्पादक धास्तावले असून द्राक्षाच्या छाटण्या देखील थांबल्याचे चित्र निफाड तालुक्यात सध्या दिसत आहे. निफाड, शिवडी, श्रीरामनगर, शिवरे, आंबेवाडी, नैताळे, विंचूर, धारणगाव लासलगावसह परिसरातील गावांमध्ये आज दुपारी चारच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसला. हा पाऊस सोयाबीनसाठी नुकसानकारक ठरणार आहे. (Heavy rain also stopped grape pruning in niphad )
सध्या निफाड तालुक्याच्या काही भागांमध्ये सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू होत असल्यामुळे या वातावरणामुळे सोयाबीन उत्पादक धास्तावले आहेत. पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर शनिवारी (ता.२१) पाऊस कोसळला आहे. निफाडच्या द्राक्षपंढरीमध्ये सध्या गोड्या बार छाटण्याची लगबग सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच या वातावरणामुळे द्राक्षांच्या छाटण्यादेखील थांबल्या आहेत. (latest marathi news)
कसबे सुकेणे ः आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसाने आज कसबे सुकेणे व परिसराला हजेरी लावल्याने सोयाबीनसह अन्य पिकांना दिलासा मिळणार आहे. पावसाअभावी या भागात सोयाबीनसह मका, भाजीपाला पिके हातातून जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ज्यांच्याकडे विहिरीद्वारे पाण्याची सोय होती त्यांनी सोयाबीनसह इतर पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली होती. मात्र सर्व शेतकऱ्यांना हे शक्य नसल्याने सोयाबीन हातचे जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. आजच्या पावसाने या भागातील ही पिके वाचणार आहेत. कसबे सुकेणे व परिसराला पावसाने सलामी दिली, त्यामुळे बळीराजा काही प्रमाणात सुखावला आहे. उशिरा का होईना पण पावसाचे आगमन झाल्याने तूर्त या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.