Khadkali Signal and Gadkari Signal esakal
नाशिक

Nashik Heavy Rain : मुसळधारेने शहराला झोडपले! रस्त्यांवर पाणीच पाणी

Heavy Rain : दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावत नागरिकांना अक्षरश: झोडपून काढले. अचानक आलेल्या मुसळधारेने तारांबळ उडाली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात बुधवारी (ता.२५) दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावत नागरिकांना अक्षरश: झोडपून काढले. अचानक आलेल्या मुसळधारेने तारांबळ उडाली. शिवाय रस्त्यांवर, सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले. दुपारी साडेबारा ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाला सुरवात झाली आहे. सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश दुपारनंतर मात्र, धो-धो पावसाला सुरवात होत आहे. (Heavy Rain Torrential rain lashes city water on roads )

अचानक टपोरे थेंबांचा पाऊस सुरु होतो. विशिष्ट भागापर्यंत मर्यादित असलेल्या या पावसामुळे विद्यार्थी, नागरिक हैराण झाले. थोड्या वेळेच्या अंतराने पुन्हा पाऊस येतो. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा सूर्यप्रकाश पडतो. पुन्हा अचानकपणे पावसाला सुरवात होते. ऊन-पावसाच्या या खेळामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बुधवारी दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबई नाका ते सीबीएस या भागातील वाहतूक दुपारी पाच ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठप्प झाली. (latest marathi news)

त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जाण्याचा मार्गही तोच असल्यामुळे वाहतूक वळविली होती. त्याचाही वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला. दुपारी सिडको, नाशिकरोड, पंचवटी आणि शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. काही मिनिटांमध्ये जोरदार वर्षाव होऊन सर्वत्र पाणी पाणी झाले. यामुळे मायको सर्कल, एमजी रोड परिसरात वाहतुकीची कोंडी झाली.

सखल भागात साचले पाणी

शहरात मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. रस्त्यावरच हे पाणी असल्यामुळे त्याखाली खड्डा आहे किंवा नाही, याची खात्री नसल्याने वाहनचालकांनी सावधपणे गाडी चालवली. दुचाकी चालकांनाही पाण्यातून मार्ग शोधण्याची कसरत करावी लागली. पुढील दोन दिवस पावसाचा मुक्काम कायम असल्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT