Jagdish Godse, Dnyaneshwar Jundre and other office bearers of Mazdoor Sangh and the heirs of deceased workers joined the service after the heirs of the deceased workers of Bharat Pratibhuti and Chalartha Patra Press joined the service. 
नाशिक

Nashik Currency Note Press : मुद्रणालयात मृत कामगारांचे वारस कामावर रुजू; दोन्ही मुद्रणालयातील 50 वारसांना नोकरी

Currency Note Press : मुद्रणालयातील २४ अशा एकूण ५० मयत कामगारांच्या वारसांना सर्व प्रक्रिया पूर्ण करून दुपारी प्रत्यक्ष कामावर रुजू करून घेतले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Currency Note Press : भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील मयत कामगाराच्या वारसांनी सेवेत रुजू झाल्यानंतर कारखान्याची शिस्त पाळावी, असे प्रतिपादन इंडिया सिक्युरीटी प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी केले. भारत प्रतिभूती मुद्रणालय २६ व चलार्थपत्र मुद्रणालयातील २४ अशा एकूण ५० मयत कामगारांच्या वारसांना सर्व प्रक्रिया पूर्ण करून दुपारी प्रत्यक्ष कामावर रुजू करून घेतले. (Heirs of deceased workers in press will join work 50 heirs of dresses will be employed )

या वेळी कामगारांच्या स्वागतासाठी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे अध्यक्षस्थानी होते. जगदीश गोडसे म्हणाले, १९९६ पर्यंत मयत झालेल्या कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेतले गेले होते. मध्यंतरी १६ वर्षांच्या कालावधीत ही प्रक्रिया महामंडळ झाल्याने बंद पडली होती. २०१२ पासून कामगार पॅनलने महामंडळाशी तडजोड करून महामंडळाच्या ९ युनिटमध्ये उपलब्ध रिक्त जागांच्या पाच टक्के मयत कामगारांच्या वारसांना कामावर घेण्याची पॉलिसी ठरविली. (latest marathi news)

यासाठी मजदूर संघाने सातत्याने पाठपुरावा केला. मागे ७७ वारसांना कामावर घेतले आणि आता ५० वारसांना कामावर घेण्यात येत आहे. अजून सात जण तांत्रिक अडचणी दूर करताच कामावर रुजू होतील. तसेच जानेवारी २०२५ मध्ये सुद्धा ५० मयत कामगारांचे वारस कामावर रुजू होतील. या उत्साही तरुणांना देतानाच या नोकरीसाठी महामंडळाकडून वय आणि शिक्षण यांच्या अटीही शिथिल करून घेतल्या आहेत. त्याचीही पूर्तता तुम्हाला करावयाची आहे, अशीही जाणीव करून दिली.

बाहेरील नोकऱ्यांचे वास्तव चित्र त्यांच्या नजरेसमोर आणून देऊन तुम्हाला विनामोबदला मिळालेल्या संधीचा कुटुंबीयांसाठी सदुपयोग करा. मुलींचाही समावेश होता. या वेळी आपल्या कुटुंबीयांची जाणीव ठेवा, असे ज्ञानेश्वर जुंद्रे म्हणाले. याप्रसंगी मजदूर संघाचे उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, रामभाऊ जगताप, प्रवीण बनसोडे, सेक्रेटरी बबन सैद, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे, अविनाश देवरूखकर, नंदू कदम, राजू जगताप, खजिनदार अशोक पेखळे, मनोज सोनवणे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्रच नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

SCROLL FOR NEXT