Broken stones of Ramwadi bridge at places. In the second photo, garbage piled up in front of the water measuring cabin at Holkar bridge. esakal
नाशिक

Nashik News : होळकर, रामवाडी पुलाची वाताहात धोकादायक स्थितीत

योगेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिकमधील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहिल्याबाई होळकर पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. तर रामवाडी येथून घारपुरे घाटाकडे जाणाऱ्या पुलाची पूर्ती दैना झाली आहे. या दोनही पुलावरून दररोज हजारो वाहने मार्गक्रमण करीत असतात. हे दोन्ही पूल धोकादायक स्थितीत जाण्याआधी दुरुस्त करण्याची गरज आहे. (Holkar and Ramwadi bridge in dangerous condition)

या मार्गावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे मनपा प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या दोन्ही पुलांचे अनेक ठिकाणी संरक्षित कठडे तुटले आहेत. होळकर रामवाडी पुलाचे कठडे तुटलेले तर बऱ्याच ठिकाणी बोगदे पडले आहेत. तसेच होळकर पुलाला समांतर बांधलेल्या पुलाच्या बाजूस असलेल्या चारीमध्ये कचरा कायमच असतो.

त्यामुळे डासांचेही प्रमाण वाढले आहे. मनपा प्रशासनाने गांभीर्यने लक्ष देऊन त्याची तातडीने दुरुस्त होण्याची गरज आहे. निर्माल्य टाकू नये, असा फलक असलेल्या ठिकाणी कचरा साचला आहे. नाशिक शहर आणि पंचवटीला जोडणाऱ्या या दोन महत्त्वाच्या पुलांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे गंभीर दुर्घटना होण्याचा धोका आहे.

या पुलावरून हजारो दुचाकी, चारचाकी वाहनाची वर्दळ असते. या पुलावरून शालेय विद्यार्थी हे पायी शाळेत ये-जा करीत असतात. होळकर पुलावर पाणी मोजण्यासाठी एक केबिन असून त्या बाहेर निर्माल्य, कचरा जमा झाल्याने दुर्गंधी पसरली आहे. रामवाडी पुलाचीदेखील अवस्था बिकट आहे. जागोजागी पुलाचे कठडे तुटलेले तर बऱ्याच ठिकाणी बोगदे पडले आहेत. (latest marathi news)

पुलावरून नदीपात्रात कचराफेक

पूर्वी मनपाच्या माध्यमातून या पुलावर दोनही बाजूला सुरक्षा म्हणून नेट लावून पॅक करण्यात आले होते. त्यामुळे या पुलावरून गोदापात्रात निर्माल्य टाकता येत नव्हते. मात्र, हे सुरक्षा नेट नसल्याने पादचारी, दुचाकी व चारचाकीहून येणारे बरेचशे नागरिक पुन्हा गोदापात्रात निर्माल्य टाकताना दिसून येत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात गोदावरी नदीला अनेकदा पूर येतो.

तो बघण्यासाठी नाशिककर हजारोच्या संख्येने होळकर रामवाडी पुलावर गर्दी करतात. मात्र, या पुलांची झालेली दुरवस्था, तुटलेले कठडे यामुळे पुलावर पाणी पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. होळकर पुलाचे वय बघता मनपाने त्याची दुरुस्ती करणे गरज आहे.

रामवाडी पुलाचे सौंदर्य पाण्यात

रामवाडी परिसरात गोदावरी नदीवर बांधलेल्या पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पुलाच्या जवळपास सर्व संरक्षक जाळ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना अनेक ठिकाणी ठिगळ लावण्यात आले आहे. मात्र, तरीही मोठमोठे बोगदे पाहायला मिळत आहेत. अशा पद्धतीने केलेल्या डागडुजीमुळे पुलाचे सौंदर्य नष्ट झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT