Kirtan ceremony performed on the occasion of Santshrestha Nivrittinath Samadhi ceremony. esakal
नाशिक

Sant Nivruttinath Palkhi : निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधी सोहळ्यास; अहमदनगर येथे अलोट गर्दी

Sant Nivruttinath Palkhi : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्यात विश्वगुरूंचा भव्य जयजयकार सोहळा झाला.

सकाळ वृत्तसेवा

Sant Nivruttinath Palkhi : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्यात विश्वगुरूंचा भव्य जयजयकार सोहळा झाला. या वेळी हजारो वारकरी उपस्थित होते. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांची पायी पालखी व दिंडी अहमदनगर येथे दोन दिवस मुक्कामी असते. परंपरेप्रमाणे त्र्यंबकेश्वर व अहमदनगर याठिकाणी बुधवारी (ता. ३) ज्येष्ठ कृष्ण द्वादशीला वारकरी उपस्थित होते. (Huge crowd at Ahmednagar for Sant Nivruttinath Sanjivan Samadhi ceremony )

समाधीचे अभंग गायन झाल्यावर फुले उधळत मोठ्या भक्तिभावाने वारकऱ्यांनी नाथांच्या पादुकांचे दर्शन घेतले. आषाढी वारीदरम्यानच्या या एका भक्तीसोहळ्याचे सर्वजण साक्षीदार झाले. त्र्यंबकेश्वर येथून २० जूनला पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवलेल्या नाथांच्या पालखीसह दिंडीने नाशिक जिल्हा ओलांडून अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी प्रवेश केला. तेराव्या दिवशी बुधवारी दिंडी डोंगरगण येथून अहमदनगर शहरात दाखल झाली होती.

त्र्यंबकेश्वरी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी निवृत्तिनाथ महाराज यांनी ज्येष्ठ कृष्ण द्वादशीला संजीवन समाधी घेतली होती. त्यांचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा बुधवारी अहमदनगर येथे परंपरेप्रमाणे झाला. नाथांचा मुखवटा व पादुका पालखीतून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे श्री विठूमाउलीच्या दर्शनासाठी निघालेल्या असतात. त्यामुळे मार्गात अहमदनगर येथेच परंपरेप्रमाणे भव्य असा, तर त्र्यंबकेश्वर येथील संजीवन समाधी मंदिरात छोटेखानी सोहळा होत असतो. (latest marathi news)

अहमदनगरच्या बाजार समिती भागात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी संजीवन समाधी सोहळ्याला सुरवात झाली. प्रथम नाथांच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. समाधी संस्थानचे परंपरागत पुजारी जयंत महाराज गोसावी व अनिल महाराज गोसावी यांनी महापूजा केली.

या वेळी अध्यक्ष कांचनताई जगताप, सचिव अमर ठोंबरे, पालखीप्रमुख नारायण मुठाळ, विश्वस्त तथा प्रसिद्धीप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे, विश्वस्त राहुल साळुंके, माजी अध्यक्ष नीलेश महाराज गाढवे, माजी सचिव सोमनाथ घोटेकर, डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, पालखीचे मानकरी मोहन महाराज बेलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, एकनाथ महाराज गोळेसर, गणपत गाडेकर, पंडित कोल्हे, पुंडलिक थेटे उपस्थित होते. पदसिद्ध विश्वस्त जयंत महाराज गोसावी यांनी निवृत्तिनाथांचे चरित्र संक्षिप्त स्वरूपात उलगडून सांगितले. त्यांच्या सर्व समाधीचे अभंग म्हटले. सद्‍गुरू निवृत्तिनाथांची समाधी प्रकरण सांगत असताना उपस्थित हजारो वारकऱ्यांचे डोळे पाणावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT