Rakesh Hande, Senior Police Inspector of Traffic Unit One inspecting after installation of hump on Chauphuli esakal
नाशिक

Nashik News : अखेर 'त्या' अपघातप्रवण रस्त्यावर बसविले हम्प

Nashik News : गेल्या काही दिवसांपासून मुंबई आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुली मृत्यूचा सापळा बनली होती.

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून मुंबई आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुली मृत्यूचा सापळा बनली होती. अलीकडे याठिकाणी घंटागाडीच्या धडकेत एका प्राध्यापिकेला आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर याठिकाणी हम्प (उंचवटा), सिग्नल यंत्रणा यांची उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी केली होती. अखेर प्रशासनाने तत्काळ या परिसरात हम्प टाकल्याने वाहनांची वेगमर्यादा कमी होऊन, संभाव्य अपघातावर आळा बसणार आहे. (Nashik amrutdham chaufuli acident Spot marahti news)

अमृतधाम चौफुलीवर घंटागाडी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात के.के.वाघ शिक्षण संस्थेच्या प्राध्यापिका जागीच ठार झाल्या होत्या. यानंतर माजी नगरसेविका प्रियांका माने तसेच अमृतधाम सार्वजनिक वाचनालय यांनी या ठिकाणी सिग्नल यंत्रणा तसेच हम्प टाकण्याची मागणी करणारे निवेदन प्रशासनाला दिले होते. (Latest Marathi News)

याची तत्काळ दखल घेत प्रशासनाने अमृतधाम चौफुली येथे हम्प टाकले आहे. यामुळे वाहनांचा वेग कामी होऊन अपघातांची संख्या कमी होईल. या वेळी वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे, मनपाचे संदेश शिंदे, प्रकाश निकम, पंकज बापते, भाजपचे शहर उपाध्यक्ष धनंजय माने, अमृतधाम सार्वजनिक वाचनालयाचे विलास कारेगावकर, जगन गोरे, ज्ञानेश्वर सोमासे, जयराम कारवाळ उपस्थित होते.

"प्रशासनाने दिलेल्या निवेदनाची तत्काळ दखल घेतल्यामुळे अमृतधाम, बळी महाराज, जत्रा चौफुली या परिसरात ठिकठिकाणी हम्प टाकण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या सर्व ठिकाणी लवकरच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत." - प्रियांका माने, माजी नगरसेविका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT