Due to continuous and satisfactory rainfall in the western part of the taluka, paddy cultivation has gained such momentum. esakal
नाशिक

Nashik Monsoon News : समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला; इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात भात, वरई लागवडीला वेग

Nashik News : इगतपुरी तालुक्यासह त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार व समाधानकारक पावसामुळे मुख्य पिक असलेल्या भाताच्या आवणीला वेग आला आहे.

विजय पगारे

Nashik News : इगतपुरी तालुक्यासह त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार व समाधानकारक पावसामुळे मुख्य पिक असलेल्या भाताच्या आवणीला वेग आला आहे. मधूनच पावसाची रिपरिप सुरु असल्यामुळे अनेक भागांत भात शेतीला प्रारंभ झालेला आहे. संपूर्ण तालुका जणू हिरवाईच्या शालुने नटला आहे. (Nashik Monsoon News)

गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने चौफेर हजेरी लावल्यामुळे भात लागवडीला (आवणीला) सर्वत्र उत्साहात सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच काही ठिकाणी ट्रॅक्टर, तर काही ठिकाणी आजही पारंपरिक पद्धतीने शेतकरी लागवड करताना दिसून येत आहे. पाऊस चांगल्या प्रमाणात होत असल्यामुळे शेतकरी खरिपाच्या कामात व्यस्त झालेला दिसून येत आहे.

इगतपुरी तालुका हा भात पिकासाठी अग्रेसर व प्रसिद्ध आहे. भातासाठी पोषक वातावरण असल्यामुळे प्रामुख्याने इंद्रायणी, गरी कोळपी, १००८, वाय.एस.आर हळे, पूनम डीएस १००, ओम ३, सेंच्युरी, ओम श्रीराम १२५, रुपाली, रुपम, विजय, आवणी, लक्ष्मी, खुशबू, सोनम, दप्तरी, वर्षा, राजेंद्र, बासमती आदी प्रमुख भाताच्या जाती तालुक्यात घेतल्या जातात.

खर्च वाढता वाढता वाढे

भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात भात शेती मोठ्या प्रमाणात होते. मात्र भात शेतीचा वाढता खर्च बघितला तर ते देखील करणे मुश्किल होत आहे. आज खतांच्या वाढणाऱ्या किमती, बी-बियाणे, औषधे हे वापरून शेतकरी मेटाकुटीस आला असून, खतांच्या किंमतीत दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढ होत आहे. भाताला दरवर्षी भाव आहे तोच राहतो. त्यामुळे भातशेतीचा खर्च वाढतच असल्याची भावना शेतकरी वर्गात आहे. (latest marathi news)

आदिवासी गाण्यांनी दुमदुमला परिसर

आदिवासी भागात आवणी कामांच्या दरम्यान गाणी म्हणून कामे केली जातात. एकमेकांच्या मदतीला जाऊन आवणीची कामे पूर्ण केली जातात. इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरच्या पश्‍चिम व आदिवासी भागासह पूर्व भागातही यंदा रोपांची चांगली वाढ झाल्याने सगळीकडे आवणीला सुरवात झाली आहे. त्र्यंबकेश्‍वर परिसरातील गिरणारे, वाघेरा, वेळुंजे, गणेशगाव, रोहिले, हिरडी, माळेगाव आदी भागात आवणीची कामे जोर धरू लागली आहेत.

चिखली का म्हणतात?

भात रोपांच्या खणणीला एक दिवस लागतो. दुसऱ्या दिवशी रोपांचे चूड बांधून बांधावर ठेवले जातात. त्यानंतर बैलजोडी नांगराच्या किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतात चिखल केला जातो. त्यानंतर खऱ्या अर्थाने भाताच्या लागवड प्रक्रियेला प्रारंभ होतो. या प्रक्रियेला भात आवणी संबोधले जाते. आदिवासी बांधव त्यास चिखली असेही म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT